… तर धोनीचे संघात पुनरागमन?

0

नवी दिल्ली : करोनाच्या धोक्‍यामुळे जर आयपीएल पूर्णच रद्द झाली तर त्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त आहे. खेळाडूंना जून महिन्यानंतर वेळच नसणार. अशा परिस्थितीत धोनीला एखाद्या मालिकेत संधी मिळू शकते का ,असा प्रश्न माजी क्रिकेटपटूंसह धोनीच्या चाहत्यांना पडला आहे.

मुळ वेळापत्रकानुसार ही स्पर्धा येत्या 29 मार्चपासून सुरु होणार होती, मात्र ती 15 एप्रिलपासून घेण्यात येणार आहे. अर्थात त्यावेळीही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती बदल झाला नाही व स्पर्धाच रद्द करावी लागली तर धोनीचे भवितव्य काय राहील असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. धोनीला संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने आयपीएलमध्ये सरस कामगिरी करावी असे संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री तसेच निवड समितीने स्पष्ट केले होते.

त्यामुळे आता ही स्पर्धाच रद्द झाली तर धोनीला संघात परतण्यासाठी थेट संघात स्थान देत अन्य मालिकेत खेळविणार की त्याला संघाबाहेरच राहावे लागणार याबाबत अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तसेच निवड समिती आणि शास्त्री यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

भारतीय संघाचे वेळापत्रक –

1)श्रीलंका दौरा (जून-जुलै) – 3 वन डे व टी-20

2) इंग्लंडविरुद्धची मालिका (ऑगस्ट-सप्टेंबर) – 3 वन डे व टी-20

3) आशिया करंडक (सप्टेंबर) – टी-20 सामने (दुबई)

4) ऑस्ट्रेलिया दौरा – (ऑक्‍टोबर) टी-20 विश्‍वकरंडक, 4 कसोटी सामने व 3 टी-20 सामने.

Leave A Reply

Your email address will not be published.