टेबलटेनिसपटू शरथ कमालने पटकावले विजेतेपद

0

मस्कत – भारताचा मानांकित टेबलटेनिसपटू अचंथा शरथ कमालने अविश्‍वसनीय कामगिरी करत ओमान ओपन आयटीटीएफ चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या प्लस गटात अंतिम फेरीत पोर्तुगालच्या मार्कोस फ्रेटीयासचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

शरथने अंतिम सामन्यात मार्कोस फ्रेटीयासचा 6-11, 11-8, 12-10, 11-9, 3-11, 17-15 असा पराभव केला. दरम्यान, त्याने उपांत्य सामन्यात रशियाच्या किरील स्काच्शेव्हवर 11-13, 11-13, 13-11, 11-9, 13-11, 8-11 व 11-7 अशी मात करत अंतिम फेरी गाठली होती.

दुसरीकडे, भारताचा नवोदित टेबल टेनिसपटू जीत चंद्रा याने ओमान ओपन आयटीटीएफ चॅलेंजर टेबल टेनिस स्पर्धेच्या 21 वर्षांखालील मुलांच्या गटाचे विजेतेपद मिळवले. अशी कामगिरी करणारा जीत देशाचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत 21 वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात जीतने आंतरराष्ट्रीय क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या मानव ठक्करचा 11-6, 11-7, 13-11 असा सरळ तीन गेममध्ये पराभव केला व विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Leave A Reply

Your email address will not be published.