रोटरी वेस्टच्या अध्यक्षपदी संगीता पाटील, सचिव परदेशी

0

जळगाव;- येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टच्या अध्यक्षपदी सौ. संगीता प्रमोद पाटील यांची तर मानद सचिवपदी राजेश परदेशी यांची निवड झाली आहे.
मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे शनिवार दि.30 रोजी सायंकाळी 7 वाजता माजी प्रांतपाल किशोर केडिया व सहप्रांतपाल झमनदास सैनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात रोटरी वेस्टच्या पहिल्या महिला अध्यक्षा संगीता पाटील व नूतन कार्यकारीणी रोटरी वर्ष 2018-19 साठीचा पदभार स्विकारणार आहेत.
संगीता पाटील या आएनआयएफडीच्या संचालिका असून राजेश परदेशी नेटव्हयू कॉम्प्युटर्सचे संचालक आहेत. उपस्थितीचे आवाहन अध्यक्ष ऍड. सुरज जहॉंगीर व मानद सचिव कुष्णकुमार वाणी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.