भङगाव शहरात ३५ महीला शोचालयांच्या दुरुस्तीचे काम सुरु

0

भङगाव ;- भङगाव शहरात जुन्या महीला शौचालयांची दयनिय अवस्था झालेली होती. नगरपरीषदेमार्फत शहरात एकुण ३५ महीला शौचालयांच्या दुरुस्तीसह सुशोभिकरण कामे सुरु आहेत. महिलांसाठी मोठया सोयीचे ठरणार आहे. याबाबत माहीती अशी कि, शहरात यापुर्वी महीला सार्वजनिक शौचालये होती. या बहुतांश शौचालयांची दयनिय अवस्था बनली होती. काही ठिकाणी झाङे झुङपे घाणीचा परीसर बनला होता. नगरपरीषदेने महीला शौचालय परीसरात स्वच्छता मोहीम राबवुन सर्वञ परीसर स्वच्छ केल्याचे दिसुन आले. स्वच्छ महाराष्टृ अभियानांतर्गत शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी महीलांसाठी सार्वजनिक शौचालय दुरुस्तीकामे आदि व वैयक्तीक शौचालय बांधण्याची योजना आदि कामे नगरपरीषदेने हाती घेतली. शौचास उघङयावर बसणार्या नागरीकांवर नगरपरीषदेने कार्यवाहीचे सञ उभारले. शहर हगणदारी मुक्तसाठी नगरपरीषद प्रशासनाने चांगली यंञणा राबविली. सध्या शहरातील जुन्या एकुण ३५ महिला शौचालयाची दयनिय अवस्था झाल्याने नगरपरीषद प्रशासनाने नुकतेच या ३५ महीला सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्तीचे कामे , सुशोभिकरणाची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. यात नव्याने सोयी सुविधा याप्रमाणे आहेत. नवीन दरवाजे , जाळया बसविणे, फर्ची बसविणे, कंपाउंङ, पाण्याची व्यवस्था, परीसर पोचरस्ता, काँंक्रीटीकरण यासह शौचालय दुरुस्तीचे कामे चालु आहेत. शौचालयांजवळ लाईट सुविधाही आहेत. महीला सार्वजनिक शौचालयाच्या कामांसाठी शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन एकुण १ कोटी २० लाख रुपये निधी मंजुर केले आहेत. ही कामे रंगरंगोटीसह दुरुस्त होत असल्याने महीलांसाठी सोयीचे ठरणार आहे. अशी माहीती मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली.नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, मुख्याधिकारी राहुल पाटील, नगरसेवकांचे सहकार्य लाभत असुन चांगले नियोजन सुरु आहे.

राहुल पाटील मुख्याधिकारी

शहरातील जुन्या महीला सार्वजनिक शौचालयांची मोठी दयनिय अवस्था झाली होती. शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतुन या महीला सार्वजनिक ३५ शौचालयांची दुरुस्ती, सुशोभिकरणाची कामे सुरु झालेली आहेत. याकामी एकुण १ कोटी २० लाख रुपये निधीही मंजुर आहेत. नागरीकांनी सहकार्य करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.