भडगाव भाजपा कडुन राष्ट्रवादीच्या निषेधार्थ तहशिलदारांना निवेदन

0

भडगाव (प्रतिनिधी)
काल दि १८ जुन सोमवारी जळगाव दौर्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलीक यांनी आमचे जिल्हाध्यक्ष उदयबापु वाघ यांनी ड्रग्ज माफियांकडुन प्रोटेक्शन मणी म्हुणण ५ लाख घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. हे सर्व आरोप बिनबुळाचे व राजकीय षडयंत्राचा भाग आहे. कारण जिल्हाध्यक्ष उदयबापु वाघ यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त आमदार, दोन्ही खासदार, सर्वात जास्त लोकनियुक्त नगराध्यक्ष, पंचायत समित्या, एकहाती जिल्हा परिषद सत्ता, बाजार समित्या, सर्वात जास्त लोकनियुक्त संरपच जिल्हात निवडुन आले. या सर्व निवडणुकामध्ये राष्ट्रवादीचा सफाया झाला आहे. म्हणुनच राष्ट्रवादीवाले वैफल्यातुन हे सर्व आरोप करित आहेत. याचा भारतीय जनता पक्ष भडगाव तालुक्याने निषेध करुन वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डाॅ संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मुकेश हिवाळे यांना निवेदन देण्यात आले. जिल्हात शतप्रतिशत असलेल्या भाजपाची बदनामी करणार्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहिर निषेधाचा आशय या निवेदन आहे.
हा आरोप एका अटक असलेल्या आरोपीवर विश्वास ठेवुन केला आहे मा. जिल्हाध्यक्षांवर जे आरोप करण्यात आले त्या आरोपांची त्वरीत चौकशी करून खोटे आरोप करण्यावर कार्यवाही व्हावी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माफी मागावी अशी अपेक्षा निवेदनामार्फत व्यक्त केली आहे. निवेदनावर भडगाव तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, तालुका सरचिटणीस वसंतराव पाटील, अनिल पाटील भडगाव शहराध्यक्ष शैलेश पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष नितीन महाजन, चिटणीस प्रदीप कोळी, वैद्यकीय आघाडी शहराध्यक्ष डाँ. शेखर पाटील, किरण पाटील, डाँ. विशाल पाटील, प्रशांत कुभारे, बन्सीलाल परदेशी, प्रशांत पाटील, सुषमा भावसार, शेखर पाटील, संजय पाटील, दिनेश पाटील, समाधान भोपे, गुलाब पाटील, सुनिल पाटील, संदिप पाटील, अजय कोळी, धर्मेद्र कोळी, धनराज पाटील यांच्या सह पदधिकारी, कार्यकर्या बंधु उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.