#NZvIND : श्रेयसची शतकी खेळी व्यर्थ; भारताला पराभवाचा

0

हॅमिल्टन : अनुभवी फलंदाज राॅस टेलरची नाबाद शतकी खेळी तसेच हेनरी निकोल्स आणि टाॅम लॅथम यांच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सलामीच्या लढतीत भारतीय संघाचा ४ गडी व ११ चेंडू राखून पराभव करत विजय नोंदविला. या विजयासह न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टी-ट्वेंटी मालिका गमावलेल्या न्यूझीलंडसाठी हा विजय आत्मविश्वास उंचावणारा ठरणार आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं न्यूझीलंडपुढं ३४७ धावांचं तगडं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून श्रेयस अय्यर यानं धडाकेबाज शतक ठोकलं. तर, कर्णधार विराट कोहली व लोकेश राहुल यांनी अर्धशतकं झळकावली. भारतीय फलंदाजांपुढं न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा मारा निष्प्रभ ठरला. अखेर ५० षटकांत भारतानं ३४७ धावांपर्यंत मजल मारली.

भारताने विजयासाठी दिलेल्या ३४८ धावांचे मोठे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.१ षटकांतच पूर्ण केले. न्यूझीलंडकडून राॅस टेलरने नाबाद १०९(८४), हेनरी निकोल्सने ७८(८२), टाॅम लथमने ६९, मार्टिन गप्टिलने ३२(४१) आणि मिचेल सॅटनरने नाबाद १२(९) धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडसमोर ३४८ धावांचे आव्हान उभारुन देखील भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.