नाचता येईना, अंगण वाकडे !

0

महापालिकेच्या दोघा अधिकाऱ्यानी माझ्या आमदारकीच्या राजीनाम्याची सुपारी  घेतलीच असे वक्तव्य करून जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांनी खळबळ उडवून दिली आहे. जळगाव शहरातील विकासाची कामे ठप्प असून त्यांचे खापर आ. भोळेंनी अधिकाऱ्यावर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न्य केला आहे. २०१४साली आ. भोळे निवडून आल्यानंतर संपूर्ण पाच वर्ष राज्यात भाजपचीच सत्ता होती. शहराच्या विकासकामासाठी राज्य शासनाकडून निधी खेचून आणने आ. भोळेंना  सहज शक्य होते.ते त्यांनी का केले नाही? गेले दीड वर्षांपासून जळगाव महापालिकेत भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. आ. भोळे यांच्याच पत्नी सौ सीमा भोळे आतापर्यंत महपौरही होत्या.

त्यामुळे शहराच्या कोणत्याही विकासकामात त्यांना कसला अडथळा येण्याचे कारण नव्हते. त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे इच्छाशक्ती हवी कल्पकता असायलाही हवी अन त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घेतोय यावरच सर्व काही अवलंबून असते. म्हणून आ. राजू मामा भोळे यांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडून ते नामानिराळे होण्याचा प्रयत्न्य करीत असतील तर पाच लाख जळगाव वासीय त्यांना कदापि माफ करणार नाहीत. अधिकारी काम करीत नसतील तर त्यांना वठणीवर आणता येऊ शकते. त्यांना जाब विचारू शकतो. प्रसंगी त्यांचेवर कामात हलगर्जी पणा केल्याप्रकरणी कायद्याचा बडगा दाखवता येतो. तसे काही न करता लोकप्रतिनिधीबाबत जनतेचा रोष वाढल्यानंतर अधिकाऱ्यांकडे  अंगुलीनिर्देश करून आमदारांनी त्यातून सुटका होईल असे त्यांना वाटत असेल तर त्यांचा हा समज चुकीचा होय. जनतेचे प्रतिनिधित्व  लोकप्रतिनिधी करतात त्यासाठी जणतेनि त्यांना निवडून दिलेले आहे. जनतेनी आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे आपल्या लोकप्रतिनिधीकडेच  करणार यात शंका नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या कशा प्रकारे सोडवायच्या हा त्यांचा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांनी माझ्या  राजीनाम्याची सुपारी  घेतलीय असे भावूक वक्तव्य करून भागणारे नाही. निवडणुक काळात जी जी आश्वासने दिली गेली. होती  त्या आश्वासनाची पूर्ती  झाली काय?या प्रश्नाचे उत्तर नाही असेच मिळते.

२०१४साली जळगाव चे खराब रस्ते चकचकीत करण्याचे आश्वासन दिले होते. जळगावचे खराब रस्ते तर चांगले झालेच नाही उलट असलेल्या रस्त्याचीही वाट लागली शहराच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वारंवार पाईप फुटीमुळे बिकट बनतोय.अमृत योजनेचे कारण पुढे करून हात झटकणे हे कितपत योग्य आहे ?शासनाकडून आलेला २५कोटींचा निधी पडून का राहिला १००कोटीच्या  निधीचा उपयोग केला गेला नाही त्याला जबाबदार कोण?जळगाव रेल्वे स्टेशन पासून ते महाबलळपर्यत शहारत एकही स्वच्छतागृह  नाही ते बांधण्याचे आश्वासन आश्वासनच का राहिले ?या सर्व प्रश्नासाठी आ. भोळे आपल्यावरील जबाबदारी दुसऱ्यावर टाकू शकत नाहीत.

कारण आ. भोळे दिवसभर महापालिकेतच बसून राहिलेले असतात असा आरोप विरोधीपक्षाच्या नगसेवकांनी केलेला होता. याचा अर्थ महापालिकेत दिवसभर बसून  राहणारे आ. भोळे नक्की काय काम करीत होते?२०१४ते २०१९ या पाच वर्षाची आ. भोळे यांच्या कारकिर्दी बाबत जनतेत  कमालीची नाराजी होती. परंतु २०१४साली झालेल्या निवडणुकीत भाजप सेनेची युती ऐन वेळी तुटल्यामुळे अन त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेशदादा जैन हे कारागृहात असल्याने आ.भोळेंना त्यावेळी निवडणूक सोपी झाली.ते निवडणून आले त्यानंतर २०१९च्या निवडणुकीत  भाजप सेनेची युती झाल्याने आ. भोळेंची जणू लॉटरीच लागली.

कारण त्यांच्यासमोर विरोधकांकडे तगडा उमेदवार नव्हता. त्यातच भाजप सेनेच्या युतीचा फायदा भोळेंना झाला अन भोळे चांगली मते घेऊन  पुन्हा विजयी झाले. विधानसभा सतत भाजपच्या हातून गेली. त्यामुळे आता आ. भोळे यांचे समोर विकास कामाचे आव्हान उभे ठाकले . शहरातील रस्त्याचा प्रश्न बिकट बनलाय जळगाववासीयांचा रोष वाढलाय आ. भोळें यांनी सळो कि पळो अशी अवस्था निंर्माण झाली असल्याने  उद्विग्नपणे आ. भोळेंनी वक्तव्य करून अधिकाऱ्यांवर खापर फोडण्याचा प्रयत्न्य केला आहे.गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत संबधीत अधिकाऱ्यांबाबत आ. भोळेंकडून कधीही वाच्यता झाली नाही. मग आताच हे अधिकरी त्यांना वाईट का दिसायला लागले. पाणी कुठेतरी मुरतेय रोग एक आणि इलाज दुसरा केला जातोय. म्हणूनच आ.भोळेंनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.कर्जबाजारी जळगाव महानगरपालिकेला कर्जमुक्त केल्याने श्रेय जसे आ. भोळे यांनी घेतले ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठे या जाहिराती करून त्यांचे श्रेय स्वतःकडे घेऊन रोखी मिरवली त्याचा निवडणुकीत फायदा करून घेतला वास्तविक फिटत आलेल्या कर्जाची रक्कम  राज्यशासनातर्फे परतफेड करण्यास आली.त्याचे श्रेय आ.भोळेंनी घेण्याचे कारणच नव्हते, जसे श्रेय घेता तसे विकास कामे होऊ शकली नाहित याची प्रांजळ कबुलीसुद्धा भोळेंनी द्यावी अधिकाऱ्यांकडे अंगुली निर्देश करून स्वतः जबाबदारी टाळू शकत नाहीत. मराठीत नाचता येईना अंगण वाकडे हा वाक्यप्रचार येथे आ. भोळेंना तंतोतंत लागू पडतो.

Leave A Reply

Your email address will not be published.