Ind vs NZ : सुपर ओव्हरमध्ये भारताचा ‘सुपर’ विजय

0

वेलिंग्टन : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी-२० सामना वेलिंग्टन येथील वेस्टपॅक स्टेडीयमवर खेळला गेला. दरम्यान, सलग दुसरा सामना अनिर्णित ठरल्यामुळे सुपर ओव्हर झाला. या सुपर ओव्हारमध्ये भारताने विजय मिळविला आहे.भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेत मालिका जिंकली.

सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी बिनबाद १४ धावा केल्या.  सुपरओव्हरमध्ये भारतीय संघाने पुन्हा एकदा १४ धावांचं आव्हान सहज पार करत विजय मिळवला.

टॉस जिंकून न्यूझीलंडने पुन्हा फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं. भारताने निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या होत्या. मात्र हे आव्हानही पार करण्यात न्यूझीलंडला अपयश आलं. न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 165 धावा केल्या. त्यामुळे सलग दुसरा टी 20 सामनाही टाय झाला.

यानंतर सुपर ओव्हरमध्ये या सामन्याचा निकाल लागला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 13 धावा केल्या. त्यामुळे विजयासाठी भारताला 14 धावांची गरज होती. पहिल्या सामन्यातील विजयीवीर रोहित शर्माला या सामन्यात विश्रांती दिल्याने, भारताकडून के एल राहुल आणि कर्णधार विराट कोहली मैदानात उतरले. राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्यानंतर विराटच्या साथीला संजू सॅमसन मैदानात आला.

 

मग स्ट्राईकवर असलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर दोन धावा आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारुन विजय मिळवला. यापूर्वी हॅमिल्टनमध्येही तिसरा टी ट्वेण्टी सामना टाय झाला होता. त्यावेळी रोहित शर्माने सलग दोन षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.