वाक येथील तरुणाचा गिरणेत बुडून मृत्यू

0

मृतदेह शोधण्याचे कार्य युद्धपातळीवर
भडगाव ;- तालुक्यातील वाक येथील 30 वर्षीय युवक गिरणा नदीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2 वाजे सुमारास घडली असून या बाबत वाक गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की, वाक येथील जगदीश चिधा पाटील (वय-30) रा. वाक.ता. भडगाव हा दुपारी दोन वाजे सुमारास जुन्या वाक गावच्या गिरणा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला होता. नदीत मोठं मोठे खड्डे असल्यामुळे त्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्याचे शव तळशी लागल्याने 4 तासा पासून शोधकार्य सुरू आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, असा परिवार आहे. या बाबत भडगाव पोलिस स्टेशन अकस्मात मृत्यूची खबर दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.