लोकप्रतिनिधींना घरचा आहेर!

0

केंद्रीय महामार्ग बांधकाम व वहातूक मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात आमदार व खासदाराच्या प्रवृत्तीवर सडकून टीका केली. केंद्र शासनातर्फे देशात रस्ते बांधणीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. रस्त्यांवरील वाढत्या वाहतुकीमुळे रस्ते अपुरे पडताहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामार्गाचे चौपदरीकरण तर चौपदरीकरण महामार्गाचे सहा पदरीकरण रस्ते बांधले जात आहेत. परंतु महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठीचे कंत्राटदाराला कंत्राट दिल्यानंतर कंत्राटदारांचे काम सुरु होण्याआधी त्या – त्या भागातील आमदार -खासदार हे त्या कंत्राटदाराला भेटतात आणि आमचे कमीशन आधी

द्या आणि त्यानंतरच काम सुरु करा असा सज्जड दम त्या कत्राटदाराला भरतात. त्याचा परिणाम संबंधित कंत्राटदार काम सुरु करण्याआधीच पडून जातात किंवा काही कंत्राटदार अर्धवट सोडून निघून जाताहेत. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झालेली असल्याने जनतेचे हाल होताहेत. नितीन गडकरी लोकप्रतिनिधींच्या बाबतीत एवढे बोलूनच थांबले नाही तर अशा हप्तखाऊ लोकप्रतिनिधींची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात येईल असाही सज्जड दम दिला. नितीन गडकरींनी व्यक्त केलेल्या व्यथेत तथ्य आहे. कारण अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. काही रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत खोदून पडलेली असल्याने वाहन चालविणाऱ्या कोंडी होतेय. खोदलेल्या रस्त्यावरून कसरत करत वाहन चालवावी लागतात. एक तासात पार होणाऱ्या रस्त्यावरून जाण्यासाठी तब्बल दोन तास लागतात. हा वेळेचा अपव्यय तर होतोच परंतु रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिकाच निर्माण झाली आहे. अपघातांमध्ये अनेकांचे हकनाक प्राण जाताहेत.
किड्या मुंग्यासारखे लोक मरताहेत. एक दिवस असा जात नाही ज्या दिवशी अपघात झालेला नाही, त्यामुळे शासन बदना होते आहे. त्यामुळेच नितीन गडकरी यांनी शेवटी त्राग्याने आमदार – खासदारांवर हल्लाबोल केला. औरंगाबाद – जळगाव दिडशे कि.मी.चे अंतर गेल्या पाच वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामाला प्रारंभ झाला. शुभारंभा नंतर दोन वर्षात चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईल असे सांगण्यात आले कंत्राटदाराला दिलेल्या निवेदनातही तसे नमूद करण्यात आले. परंतु त्याला पाच वर्षे पूर्ण झाली असतांना अद्याप चौपदरीकरणाचे काम पूर्ण तर झालेच नाही उलट अर्धवट स्थितीत रस्ता खोदून ठेवल्यामुळे जळगावहून औरंगाबादला जाणे म्हणजे मोठे दिव्यच होय. अनेकवाहनधारक चाळीसगाव मागे औरंगाबादला जाणे पसंत करताहेत. परंतुजळगाव चाळीसगाव पर्यंतच्या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे वहानधारकांना त्यामार्गेही कसरत करावीच लागते. परंतु दगडापेक्षा वीट मऊ असा प्रकार म्हणता येईल. महाराष्ट्रातील जनतेची होणारी कुचंबना आपण एकवेळ समजू शकतो परंतु वेरूळ आणि अजिंठा येथील जगप्रसिद्ध लेण्या पहाण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांची होणारी कुचंबना ही आपल्या देशाची इभ्रत घालवणारी आहे. म्हणून नितीन गडकरींचा संताप रास्तच म्हणावा लागेल. महामार्ग क्र. ६ हा मुंबई – नागपुर महामार्ग जळगाव जिल्ह्यातून जातो पाच वर्षापूर्वी फागणे ते चिखली या सुमारे १५० कि.मी. महामार्गाच्या चौपदरीकरण कामाची निविदा काढण्यात आली. बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यावसायिक संस्था एल अॅण्ड टी कंपनीने घेतले. त्यानंतर चौदरीकरणाच्या प्रथमदर्शी कामाला प्रारंभ ही झाला. महामार्गावर कामाच्या नियोजनासाठी सिकठिकाणी कंपनीतर्फे डेपो उभारण्यात आले. मशिनरी आपली गेला. अडथळा निर्माण करणारे महामार्गावरील झाडांची तोडही केली.

अचानक काम बंद पडले. काही दिवसातच एल अंडी कंपनीतर्फे गाशा गुंडाळला गेला आणि कंपनीने काम करण्यास नकार दिला. आता माशी कुठे शिकली हे कळायला मार्ग नाही. त्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या. परंतु सुरु झालेले चौपदरीकरणाचे काम मात्र बंद पडले. त्यानंतर नव्याने पुन्हा निविदा प्रक्रीया करण्यात वेळ गेला.परंतु निविदा घेण्यास एकही कंत्राटदार पुढे आला नाही. म्हणून १५० कि.मी. रस्त्याचे फागवे ते तरसोद आणि तरसोद ते फागणे असे दोन भाग केले गेले. दोन्ही कामाच्या निविदा निघाल्या. परंतु दोन पैकी फागणे ते तरसोद या कामाची निविदा कंत्राटदाराने घेतली. आणि कामाला गतीने सुरुवात झाली. अवघ्या दोन ते तीन वर्षात चौपदरीकरण पूर्व होईल असे वाटप असतानाच काम बंद पडले नव्हे कासवगतीने काम चालले आहे. अजून तीन-चार वर्ष तरी लागतील. दरम्यान रेंगाळलेले तरसोद – रस्त्यावरील खड्ड्यामुळे व खोदाईमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत चिखली कामाची निविदा मंजूर होवून अवघ्या दिड वर्षात काम संथगतीने चालू आहे. हे सर्व सागण्याचे तात्पर्य एवढेच की, ज्यांना लोकांनी मते देवून आमदार-खासदार म्हणून निवडून देतात. त्या लोकप्रतिनिधींकडून विकासाची कामे करण्याची जनतेची अपेक्षा असते. असे असतांना स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून देणाऱ्या जनतेलाच वेळीस धरले जावे म्हणजे हा कृतघ्नपणाचा कळसच म्हणावा लागेल. चाहुल जनतेच्या सुखसोयीसाठी हिरीरीने पुढाकार घेवून निहितवेळेत दर्जेदार कामे कशी होतील याची दखल घेणे. लोकप्रतिनिधीचे काम असतांना हप्ेखोरीच्या हव्यासापायी विकास कामात आमदार-खासदार खोळबा घातला असतील तर नितीन गडकरींचा हल्लाबोल योग्यच म्हणावा लागेल. अशा लोकप्रतिनिधींना धडा शिकवले गरजेच आहे. विकास कामे विहित वेळेत का होत नाहीत. यासाठी आमदार खासदारांनी हिरीरीने पुढाकार घ्यायला हवा. तसे झालेतर लोकांच्या तक्रारी आपोआप कमी होतील.

Leave A Reply

Your email address will not be published.