रेल्वेच्या भंगाराची चोरी, एकास कोठडी

0

भुसावळ :

रेल्वेच्या भंगाराची चोरी करुन खरेदी विक्री करणार्‍या तिघांविरुद्ध भुसावळ रेल्वे यार्ड आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भंगार दुकानदारास अटक करण्यात आली आहे. रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्यास ७जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले.
आशिया महामार्ग क्र. ४६ वरील सुर्यवंशी क्लिनीकच्या फलकाजवळ जाकीर (जग्गु) उस्मान खाटीक रा. अंजुमन शाळेजवळ याने नासीर उर्फ नस्या व कालू या दोघांकडून रेल्वेचे ८१ किले ४०० ग्रॅम वजनाचे १ हजार २२१रु किंमतीचे भंगार साहित्य चोरुन खरेदी केले होते. वरिष्ठ विभागीय आयुक्त ए. पी. दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी. एच. पाटील, उपनिरीक्षक जी. एस. यादव, एएसआय देशराज सिंह, कॉन्स्टेबल मनोज सोनवणे व महेश सपकाळे यांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकून भंगार साहित्य जप्त केले. यात दुकानमालक जाकीर उर्प जग्गु यास अटक करण्यात आली असून भुसावळ रेल्वे न्यायालयाने त्यास ७ जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास उपनिरीक्षक घनशाम यादव हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.