नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी संगीताची गरज डॉ. संतोष बोराडे

0
भुसावळ (प्रतिनिधी )- आपल्या शरीराचे कार्य मेंदू चालत असतो या मेंदूला आपण चांगले खाद्य दिले पाहिजे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे दिवसभरामध्ये सात हजारापेक्षा जास्त विचार आपल्या मनात येत असतात यामधले सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांची संख्या जास्त असल्याने कशा पद्धतीचे संप्रेरक आपल्या शरीरात ठेवतात आणि यामुळेच वेगळ्या व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते व्याधी लागल्यानंतर व्यक्ती हा नकारात्मक भूमिकेत जातो या नकारात्मक भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी संगीताची गरज आहे.
  तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी व शिक्षक व त्यांच्या पालकांसाठी दोन सत्रांमध्ये संगीतामधून आरोग्य चिकित्सा व तणाव मुक्ती या विषयावरती ती पुणे येथील म्युझिक थेरपिस्ट डॉक्टर संतोष बोराडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना ते विद्यार्थ्यांना मिळाले की आपण नेहमी आनंदी असले पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक भावना तयार होतात आणि यामुळे याचा परिणाम आपल्या अभ्यासावर होत असतो सकारात्मक गोष्टींचा विचार करताना त्या आपल्यासाठी घातक आहे का प्रेरणादायी आहे याचा देखील विचार होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांनी दररोज संगीत ऐकले पाहिजे संगीतामुळे आपल्या मेंदूचा व्यायाम होतो मेंदूला ऊर्जा मिळते आणि पुन्हा नव्या जोमाने व नव्या उमेदीने कामाला लागू शकतो यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मेंदूचा वापर हा चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे
शास्त्रीय संगीत आरोग्यासाठी उत्तम 
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपला आहार विहार व जीवन शैली बदललेली आहे याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावरही होतो कमी वयातच हृदयविकार शुगर रक्तदाब व कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागते शास्त्रीय संगीतामुळे हे आजार बरे करणे व ते होऊ नये यासाठी दमदार आहे आपण याचा वापर केला पाहिजे हे समजून घेण्यासाठी आपल्याला कुठे शिकण्याची गरज नाही निसर्गाने आपल्याला ही दैवी शक्ती दिलेली आहे हे फक्त गरज आहे ती शांतपणे ऐकण्याची जन्मापासूनच आपण रागामध्ये गाण्याची सवय आहे आता फक्त्त्त मोठे झाल्यामुळे  आपल्यामध्ये लाज शरम  व आपला हुद्दा यामुळे त्या गोष्टींना आपण विसरलो आहोत पुन्हा शास्त्रीय संगीत ऐका व आरोग्य मुक्त व्हा अशा प्रकारचा सल्ला त्यांनी यावेळी दिला
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष वंदना पाटील सचिव चंद्रशेखर झोपे मुख्याध्यापक आर ए वाघ उपमुख्याध्यापिका व्ही के चव्हाण पर्यवेक्षक एस जी चौधरी रूपा कुलकर्णी एम व्ही सपकाळे विद्यार्थी कृती समितीचे सदस्य शिक्षक व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार गोपाल पाटील यांनी मानले
वाचनाची गोडी लावा
यावेळी विद्यार्थ्यांशी बोलताना बोराडे म्हणाले आज विविध कादंबऱ्या वरती चित्रपट निघाले आहेत आपल्याला चित्रपट आवडतात त्यातली गाणी आपल्या ओठांवरती येतात त्या चित्रपटाची स्टोरी या कादंबरीतून घेतली ती कादंबरी आपण वाचतच नाही ती कादंबरी वाचून बघा जगातला सर्वात मोठा आनंद तुम्हाला या ठिकाणी मिळेल

Leave A Reply

Your email address will not be published.