नागराजच्या ‘झुंड’ चित्रपटाचा टीझर लाँच

0

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित, ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित ‘झुंड’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला आहे. अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विटरवरुन झुंडचा टीझर शेअर केला आहे.

‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिकेत झळकणार असल्याचे समजतंय. अमिताभ यांचा हा सिनेमा फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.‘झुंड’ हा सिनेमा भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत.

दरम्यान, टीझरमध्ये सुद्धा नागराजने कोणाचाच चेहरा दाखवलेला नाही. आतापर्यंत या सिनेमाची रिलीज डेट नागराजने गुलदस्त्यात ठेवली होती त्यावरुन ही आता पडद्या उचलण्यात आला आहे. 8 मे 2020ला अमिताभ बच्चन व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.