वाचनाने मन समृद्ध होईल – ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर

0
एरंडोल येथील कीर्तनात केला युवकांच्या कार्याचा गौरव.
प्रतिनिधी – एरंडोल
वाचनाने मन समृद्ध होईल व ते आजच्या पिढीने करावे.अन्यथा येणारा काळ खुपच भयानक असल्याचे संकेत ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी एरंडोल येथे रा.ति. काबरे विद्यालयाच्या प्रांगणात मैत्रे सेवा फाउंडेशन तर्फे कल्पतरु वाचनालय अभियानाच्या प्रथम चारणाच्या सांगते प्रसंगी आयोजित समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमात कीर्तन करतांना ते बोलत होते.यावेळी खासदार उन्मेष पाटील, एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील,एरंडोल चे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी,उपनगराध्यक्ष नितीन चौधरी,माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन,उद्योजक संजय काबरा,कुशल तिवारी,नगरपालिका नगरसेवक, नगरसेविका,व्यापारी,पंचायत समिती सदस्य,जि. प.सदस्य,तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, सदस्य,डॉक्टर,वकील,शिक्षक,शेतकरी,नोकरदार,समाजसेवक,असंख्य नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
    पुढे आपल्या कीर्तनात बोलतांना महाराजांनी सत्य व ज्ञान बद्दल बोलतांना अभंगाची संपूर्ण माहिती देत त्यांच्या अध्यायाच्या आधारावर मुर्ख माणसाला समाजात मान मिळाल्याने सज्जनांना त्रास होत असल्याचे सांगितले.याच बरोबर माणसाची उंची त्याच्या ज्ञानावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.पापाचा पैसा मानसिक अपंग पिढी जन्माला घालतो असा टोला त्यांनी वाईट प्रवृत्तीने कमावलेल्या पैसेवाल्यांना लगावला.याच बरोबर विविध उदाहरणातून त्यांनी देव असल्याचे देखील सिद्ध केले. तसेच खरे सुशिक्षित आई – वडिलांवर प्रेम करणारे व धर्म ज्यांना कळतो तेच असतात असे त्यांनी सांगितले. एरंडोल च्या मैत्री सेवा फाउंडेशन च्या तरुणांनी केलेल्या कार्याचा आधार घेत त्यांनी समाजात अशी मुलं असल्या बद्दल समाधान व्यक्त केले व समजला अशा तरुणांची गरज असल्याचे सांगितले. मुलं बिघडण्यात कुटुंब व्यवस्था जबाबदार असल्याचेही त्यांनी आपल्या कीर्तनात सांगितले. जसे काम सरकारचे आहे त्याच प्रमाणे लोकांचे देखील त्यापेक्षा जास्त काम असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचा सांभाळ गरीब करीत असुन एके दिवशी शेतकरीच देशाचा राजा होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.येत्या दोन वर्षात माणुस माणुस राहणार नाही,दशक्रिया विधी बंद होणार,नोकरी मिळणार नाही,बायको मिळणार नाही व शेतकरी राजा होणार असल्याचे भाकीत देखील त्यांनी आपल्या कीर्तनात केले.
     कीर्तनाला ६ ते ७ हजार भाविक हजर होते तसेच जवळपास दोन तास विनोदी शैलीने चाललेल्या कीर्तनात एकही व्यक्ती जागचा हलला नाही.यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार निधीतून पाच लाख रुपये तर आमदार चिमणराव पाटील यांनी दहा लाख रुपये निधी मैत्री सेवा फाउंडेशनच्या वाचनालयाला निधी देण्याचे जाहीर केले तर सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,संजय काबरा,दशरथभाऊ महाजन मित्र मंडळातर्फे,कुशल तिवारी,डॉ.प्रशांत पाटील,समाधान पाटील आदींनी सुद्धा यावेळी मैत्री सेवा फाउंडेशन च्या वाचनालय बांधकामास रोख पैशांच्या व वस्तूंच्या रुपात देणगी देण्याचे यावेळी जाहीर केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतुल महाजन,नगरसेवक कुणाल महाजन,निलेश परदेशी,प्रशांत महाजन,आकाश महाजन,नगरसेवक अभिजित पाटील,संघरत्न गायकवाड, जितेंद्र महाजन,अमोल तंबोली,नारसेवक योगेश महाजन,प्रमोद महाजन,महेंद्र चौधरी, सचिन महाजन,स्वप्निल महाजन यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पियुष चौधरी, सागर महाजन,पंकज पाटील, तुषार महाजन,करण पाटील,शुभम महाजन,मनोज महाजन,साहिल पिंजारी,ज्ञानेश्वर महाजन,श्यामसिंग पाटील,हरेश चौधरी, संतोष जैस्वाल,विनीत पाटील,हेमंत पाटील,कुलदीप पवार,गौरव महाजन,निखिल शेंडे,निखिल बाकळे, प्रितेश पाटील,आदित्य पाटील,रोशन महाजन,जयविर पाटील,सचिन पाटील,देवेंद्र पाटील,चेतन शिंपी या युवकांनी परिश्रम घेतले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर मोरणकार,प्रास्ताविक पियुष चौधरी तर आभार सागर महाजन यांनी मानले.याप्रसंगी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल उनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Leave A Reply

Your email address will not be published.