८१ कोटीच्या कर्ज प्रकरणी जिल्हा बँक चर्चेत

0

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे सर्वपक्षीय संचालन मंडळ असले तरी या बॅकेवर माजी मंत्री भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे याचेच वर्चस्व आहे. बँकेच्या चेअरमन सौ रोहिणी खडसे खेवलकर बँक संचालक मंडळात नवख्या असताना अनेक अनुभवी संचालकाना डावलून रोहणीला चेअरमन करण्यात आले.बँकेच्या संचालक मंडळात माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकारणात तीन साडेतीन वर्षात विळ्या भोपळ्याचे नाते होते. खडसे कुटूंबातच बँक दूध संघ आमदारकी असल्याचा आरोप महाजनांनी केला होता. जिल्हा बँकेत नाथाभाऊच्या साखर कारखान्यासाठी ५० कोटी रुपयाचे कर्ज मंजूर करण्याचा विषय संचालक मंडळाच्या बैठकीत आला तेव्हा त्या कर्ज मंजुरी प्रकरणाला गिरीश महाजनांनी विरोध केला होता. त्यावेळी महाजन हे राज्यमंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे ते विश्वासू सहकारी होते. महाजनांच्या विरोधात नंतरही ते ५० कोटी रुपयाचे कर्ज संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले होते. आता नाथाभाऊचा मुक्ताई साखर कारखान्याला पुन्हा ८१कोटी रुपयाचे भांडवली कर्ज हवे असून तशा आशयाची मागणी कारखान्यातर्फे बँकेकडे करण्यात आली आहे. 

शुक्रवार दिनांक १०जानेवारी  रोजी तब्बल चार महिन्यानंतर बँक संचालक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत प्रामुख्याने मुक्ताई साखर कारखान्याचे ८१ कोटीचे कर्ज प्रकरण आणि नोकरभरती या दोन विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ५०कोटीच्या कर्ज प्रकरणाला विरोध करणारे गिरीश महाजन हे यावेळी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजपची सत्ता गेल्यानंतर एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात दिलजमाई झाली. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेत नाथाभाऊचा वरचष्मा असला तरी भाजपची सत्ता कायम राहिली. नाथाभाऊ महाजन वरवर एकत्र आले असे वाटत असले तरी मनाने एकत्र आहेत असे वाटत नाही. तरीसुद्धा नाथाभाऊ आणि महाजन आता पुढील काही काळासाठी एकत्र राहणे आवश्यक आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बँक संचालक मंडळाच्या बैठकीला गिरीश महाजन हे मुक्ताई साखर कारखान्याच्या ८१ कोटीच्या कर्जप्रकरणाला मंजुरी देतील यात शंका नाही. कारण नाथाभाऊना आता विरोध करणे महाजनांना अडचणीचे ठरणार आहे. आमच्यात आता मतभेद राहिलेले नाहीत असेच या दोघा  नेत्यांना दाखवावे लागणार आहे. 

भाजपची राज्यातील सत्ता गेली आणि स्थानिक पातळीवरील सर्व समीकरणच बदलली. मुक्ताई साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणाच्या विषय जिल्हास्तरीय चर्चेत येण्याचे कारण म्हणजे मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत  पाटील यानि कर्ज प्रकरणाला केलेला विरोध हे होय आ चंद्रकांत पाटील आणि एकनाथराव खडसे यांचे कट्टर विरोधक सौ रोहिणी खडसेचा विधानसभा निवडणुकीत पराभव करून चंद्रकांत पाटील विधानसभेत पोहचले आहे. गेल्या ३०वर्षापासून मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ हा एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला होय. त्या गडालाच आ चंद्रकांत पाटीलानी सुरुंग लावला.त्यामुळे जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकनाथराव खडसेची सत्ता असल्याने बँकेच्या बारीक सारीक गोष्टीवर आ चंद्रकांत पाटील नजर ठेवून आहेत. शेतकऱ्यांसाठी व सहकार क्षेत्रासाठी  असलेल्या बँकेकडून अन्याय केला जातोय हि पाटलाची भूमिका आहे. जिल्ह्यातील चोपडा सह साखर कारखाना तसेच फैजपूर येथील मधुकर सह साखर कारखान्याकडून बँकेकडे कर्जाची मागणी होत असताना त्यांना कर्ज दिले जात नाही परंतु मुक्ताई या खाजगी साखर कारखान्याला बँकेकडून एवढे मोठे कर्ज दिले जाऊ नये हा त्यांचा मुद्दा असून तो चंद्रकांत पाटलांनी प्रतिष्ठेचा बनवला आहे. अगदी मुख्यंमत्रीपर्यंत हा विषय चंद्रकांत पाटील यांचा मुद्दा भावनिक असला तरी बँकेच्या व्यवहार भावनेवर चालत नाही. बँकेतर्फे ज्या ज्या संस्थांना कर्ज देण्यात आलेले आहे. त्या संस्था कडून त्या कर्जाची नियमित फेड होते का ?हा मुद्दा प्रथमदर्शनी विचारात घेतला जातो. चोपडा व फैजपूरच्या कारखान्याबाबत हाच मुद्दा नेमका अडचणींचा ठरतो. 

त्यामुळे बँकेच्या नियमानुसार तसेच नाबार्डच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कर्ज प्रकरणाला मंजुरी देण्यात येते. अन्यथा कर्ज प्रकरण मंजूर करणारे अडचणीत येते. त्यामुळे या एका मुद्यावरून आ चंद्रकांत पाटील यांचा  मुद्दा खोडला जाऊ शकतो. कारण बँकेतर्फे यापूर्वी मुक्ताई कारखान्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड नियमित केली जातेय तसेच मुक्ताई कारखाण्याच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी त्यांची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवलेली आहे. त्यामुळेच ३८ कोटी रुपयाला विकत घेतलेल्या मुक्ताई साखर कारखान्याला ८१ कोटी रुपये मंजूर कसे काय केले जातात या चंद्रकांत पाटलाचा म्हंणण्यात तथ्यांश नाही. एकनाथराव खडसे हे चद्रकांत पाटलाचे राजकीय विरोधक आहेत म्हणून विरोधासाठी विरोध केला जातोय असाच त्यांचा अर्थ होय. शेवटी बँकेला व्यवहार करायचा असल्याने कर्ज देणे क्रमप्राप्त आहे. तरीसुद्धा आ चद्रकांत पाटलाच्या विरोधाने बँकेच्या बेलगाम व्यवहारावर अंकुश बसणार आहे हेही तितकेच खरे.          

Leave A Reply

Your email address will not be published.