कार्यकर्ते जिंकले नेते हरले !

0

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकित भाजपने सत्ता गमावल्यानंतर पक्षात विविध स्तरावर तडजोड होताना दिसते आहे. फडणवीस महाजनांनी माझे तिकीट कापून आरोप करणारे भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजनांशी हातमिळवणी केली. महाजनांनी सुद्धा एक पाऊल मागे घेऊन नाथाभाऊशी जुळवून घेतले.जळगाव जि प अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सभापतीपदाच्या निवडीत एकनाथराव खडसेचा पूर्ण वरचष्मा दिसून आला. खडसेंच्या या भूमिकेला गिरीश महाजनांनी मूग गिळून संमती दिली. महाजनांनी तसे केले नसते तर जळगाव जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या निवडिचे चित्र वेगळेच दिसले असते.

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात म्हणजे ती पूर्व दिशा अश्या अविर्भावात असलेल्या गिरीश महाजनाना नाथाभाऊपुढे नमते  घ्यावे लागले. भाजपतील या दोन नेत्याच्या भांडणाचा परिणाम भाजपच्या कार्यकर्त्यात स्पष्ट उमटल्याचे चित्र सभापतीपदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. जि प अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत शांतपणे पार पडली. अंतर्गत धुसफूस होती परंतु ती उघड झाली नाही. भाजप कार्यकर्त्यातील नाराजीचा स्फोट सभापती निवडणुकीत झाला. भाजपच्या वरिष्ठानी निवड केलेल्या जि प सदस्यांच्या नावाला विरोध करून बंड पुकारले पक्षाचा आदेश धुडकावून सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरले गेले. एका सभापतीपदासाठी भाजपतर्फे तीन सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.श्रेष्ठीनी दोन सदस्याना माघार घेण्याचे निर्देश दिले परंतु श्रेष्ठीचा आदेश धुडकावला गेला. भाजप श्रेष्ठी अर्थात एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन हतबल झाले. येथे सदस्यांऐवजी श्रेष्ठीना माघार घ्यावी लागली. रवींद्र पाटील या सदस्यांनी बंड करण्याच्या  पवित्र्यात  असल्याचे दिसताच भाजपचा उमेदवार पराभूत होईल या भीतीने श्रेष्ठीनी बंड पुकारलेल्या सदस्यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केले इतर सदस्यांना  माघार घ्यायला लावली. दरम्यान सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेळी भाजप सदस्यांमध्ये अभूतपूर्व असा गोंधळ झाला. भाजपच्या शिस्तीचा भंग करणारा प्रकार घडला. परंतु शिस्तभंगाची कारवाई करण्याची हिमंत भाजपने केली नाही. याचे एकमेव कारण  म्हणजे राज्यातील सत्ताबदल हे होय राज्यात महाविकास आघाडीवर आल्याने जि प त सुद्धा सत्तेची समीकरणे बदलली बंडाचे निशाण हाती घेतलेल्या सदस्यांनी श्रेष्ठीना नमवले. भाजपच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले असे म्हणावे लागेल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने अधिकृत उमेदवार उन्मेष पाटील यांच्या अमळनेर येथील जाहीर सभेत तत्कालीन भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार जेष्ठ नेते डॉ बी एस पाटील याना व्यासपीठावरच जीवघेणा हल्ला केला. तेव्हापासून जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांतील नाराजी विविध कारणाने उफाळून येते आहे. तशातला हा परवाचा  प्रकार म्हणावा लागेल पक्ष सत्तेत नसेल कार्यकर्त्यांना सांभाळावे जिकिरीचे जाते गेल्या साडेतीन वर्षात भाजपत माजी मंत्री एकनाथराव खडसेना जी वागणूक दिली त्यांना सत्तेपासून  वंचित ठेवण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांचे तिकीट कापले गेले. नाथाभाऊच्या कन्या रोहिणी  खडसेचा नियोजनपूर्वक  पराभव केला गेला. परिणामी नाथाभाऊनि पक्षात बंड पुकारले माजी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसावर हल्लबोल केला.मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी नाथाभाऊनी केली.

पक्षांतर करण्याचे हत्यार त्यांनी पुढे केले. शेवटी तडजोडीने बंड शमले. वरवर हे बंड शमले असे वाटत असले तरी नाथाभाऊ हार पत्करणारे नाहीत. त्यांना झालेल्या खोलवर जखमेला एवढ्या सहजरित्या ते विसरू शकणारे नाहीत. कारण त्यांचे राजकारण संपवण्याचा धाक घातला गेला. म्हणून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत एकनाथराव खडसेंनी आपली हुकुमत गाजवली. जळगाव जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यादांच एक रावेर लोकसभा मतदारसंघातून सहापैकी पाच पदाधिकारी जि प वर निवडून आणून नाथाभाऊनी आपला वरचष्मा सिद्ध केला. तसे सहाच्या सहा पदाधिकारी हे समर्थक आहेत. यापुढे सुद्धा जळगाव जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ. यांच्या होणाऱ्या निवडणुकीत नाथाभाऊचेच वर्चस्व राहील. नाथाभाऊ जे ठरवतील त्याला पक्षातर्फे संमती देणे क्रमप्राप्त ठरेल कारण आजच निकाल जाहीर झालेल्या सहा जिल्हा परिषद निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर जि प त पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. नागपूर जि प त असलेली भाजपची सत्ता कॉग्रेसने हिसकावून घेतली आहे. इतर पाच जि प पैकी धुळे वगळता इतर चार जिल्हा परिषद त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. त्यामुळे राज्यात सत्ता बदलताच राज्यातील स्थानिक निवडणुकीतही समीकरणे बदलत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नागपूरमध्ये ग्रामीण भागाची धुरा सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांचे विधानसभेचे तिकीट कापल्याचा परिणाम पक्षाला भोगावा लागल्याचे स्पष्ट बोलले जात आहे. जळगाव जि प पदाधिकारी निवडणुकीत भाजप सदस्यांनी बंडाचा दणका देत नेत्यांना हार पत्करावी लागली.

Leave A Reply

Your email address will not be published.