फडणवीस,गिरीशभाऊवर नाथाभाऊचा निशाणा

0

भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीच आपले तिकीट कापल्याचा स्पष्ट आरोप केला. राजकारणात मी त्यांना डोईजड होऊ नये म्हणून त्यांनी माझे राजकारण संपवण्यासाठी हे कृत्य केले असेही नाथाभाऊंनी म्हटले आहे.ऑक्टोबर २०१९च्या विधानसभा निवडणुकीस कन्या रोहणिचा पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच नाथाभावूनि नावे देऊन स्पष्ट आरोप केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

विधानसभा निवडणूक निकालानंतर नाराज असलेले एकनाथराव खडसे भाजपतील कार्यकर्त्यानी पक्षविरोधी केलेल्या कारवाईमुळे मुक्ताईनगरात भाजपच्या अधिकृत उमेदवार रोहिणी खडसेंचा  पराभव झाला असे वारंवार आपल्या भावना व्यक्त करीत होते पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्याची यादीसुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलानी सुद्धा यादी दिल्याचे मान्य करुन त्याबाबत योग्य तो अभ्यास आणि चौकशी केली जाईल आणि दोषीं असतील तर त्याचेवर भाजपतर्फे कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले परंतु चंद्रकांत पाटलांचे चौकशी करण्याचे आणि कारवाईचे आश्वासन हे आश्वासनच राहिले. जळगावला उत्तर महाराष्ट्र विभागातील निवडणूक निकालाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या भाजपच्या बैठकीत सुद्धा नाथाभाऊना डावलण्यात  आले.त्यांना फक्त जळगाव जिल्ह्यातील निवडणूक आढावा बैठकीचेच निमंत्रण होते. त्या बैठकीतसुद्धा नाथाभाऊंनी चंद्रकांत पाटलाकडे दिलेल्या यादीच पुनरुच्चार करून कारवाई करण्याचे चंद्रकांत पाटलांनी आश्वासन दिल्याचे सांगितले तथापि चंद्रकांत पाटलांकडून काही हालचाल होत नसल्याने पाहून नाथाभाऊनी दिल्ली गाठली. दिल्लीत पक्षाचे कार्यध्यक्ष जे पी नड्डा याची भेट घेऊन माहिती दिली कारवाई करण्याचे त्याचेकडून आश्वासन नाथाभाऊना मिळाले परंतु पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यावरचे आश्वासनांचे मात्र घोगडें भिजत पडले.दरम्यान एकनाथराव खडसे पक्षांतर करण्याचा जोरदार वावड्या उठल्या परळीला गोपीनाथगडावर नाथाभाऊनी महाराष्ट्रातील पक्ष नेतृत्वावर चौफेर फटकेबाजी केली त्यानंतर ते भाजप रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉग्रेस अथवा शिवसेना प्रवेश करणार असे वाटत असताना त्यालाही विराम मिळाला.

एकनाथराव खडसेना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याइतपत आमच्याकडे साधनसामुग्री नाही असे सूचक वक्तव्य करून राष्ट्रवादी कॉग्रेसची दारे नाथाभाऊसाठी बंद केल्याचे स्पष्ट केले. जे राष्ट्रवादीचे झाले तेच शिवसेनेचेही नाथाभाऊच्या संदर्भांत झाले. त्यामुळे  नाथाभाऊना अखेर नमते  लागले. असे वाटत असतानाच आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन याची नावे घेऊन तोफ डागली.त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २०१४च्या विधानसभा निवडनुकीत भाजपसाठी एकनाथराव खडसे फार मोलाची भूमिका बजावली होती. भाजप-शिवसेनेची युती ऐन शेवटच्या वेळी तुटली मी युती तोडली दोन पक्षाची तुटली परंतु एकनाथराव खडसेंनी त्याची जबाबदारी स्वतःवर होय मी घेतली असे जाहीर वक्तव्ये एकनाथरावानी केली. परंतु भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्याने नाथाभाऊची पंचायत झाली. त्यातच सत्ता स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदाचे आपण दावेदार आहोत. म्हणून नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरले जेष्ठतेनुसार आणि अनुभव पाहावा मुख्यमंत्रीपदासाठी त्याची योग्यता होतीच परंतु पक्षाने विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस याचे गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. नाथाभाऊचे नाव मागे पडले. परंतु मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या नाथाभाऊना  सुरुवातीला महसूलसह१०-१२ खात्याचा भार टाकला गेला परंतु अवघ्या दीडवर्षातच त्याचा गेम केला. त्यांना मंत्रिमंडळातुन पायउतार व्हावे लागले. त्यानंतर २०१९ची विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत भाजप त्यांना दुय्यम वागणूक दिली गेली. त्यांचे पक्षातील सर्व अधिकार काढून घेऊन त्यांचे पंख छाटले गेले.दरम्यान जळगाव जिल्ह्यात फडणवीसांचे निकटचे सहकारी म्हणून गिरीश महाजन यांचे वर्चस्व वाढले. जळगाव जिल्ह्याच्या संदर्भात गिरीश महाजनाचा शब्द प्रभाव मानला जाऊ लागला.

भाजपचे संकटमोचन म्हणून त्याचा गवगवा वाढला त्यातच राज्य विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी गिरीश महाजनांवर सोपविण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी जळगाव येथे महाजनादेश यात्रेत केल्यामुळे महाजनांचे पक्षात पुन्हा महत्व वाढले भाजपच्या कोअर कमिटीतही नाथाभाऊना डावलून गिरीश महाजनाना घेण्यात आले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथराव खडसेंचे तिकीट कापले गेले. पक्षाकडून तिकीट मिळणार म्हणून अधिकृत उमेदवारी घोषित होण्याआधी एकनाथराव खडसेंनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाद्वारे उमेदवारी अर्ज भरला. परंतु अखेरच्या क्षणी नाथाभाऊंऐवजी रोहिणी खडसेला जाहीर झाली. अशाप्रकारे तीन साडेतीन वर्ष पक्षातर्फे नाथाभाऊना नगण्य वागणूक दिली गेली. आणि शेवटी उमेदवारी नाकारून त्याचा पत्ता कट केला. त्यामुळे नाथाभाऊ म्हणतात यामागे माझे राजकारण संपवण्याचा कट देवेंद्र  फडणवीस आणि गिरीश महाजनांनी केला या त्याच्या म्हणण्यास त्याचेदृष्टीने  तथ्यांश असला तरी गिरीश महाजनांनी त्यांचे खंडन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.