राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर मेळाव्यात २७९ युवक युवतीनी दिला परिचय

0


राज्यातून तसेच परराज्यातून तीन हजार समाज बांधवांची उपस्थिती, मुकेश सोनवणेंचा वाढदिवस व आ.लताताई सोनवणेंचा नागरी सत्कार
जळगाव, दि २९-  श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्था जळगाव संचलित राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्यात २७९  विवाह इच्छूक उमेदवारांनी  परिचय करुन दिला.
सरदार वल्लभभाई पटेल हॉलमध्ये आयोजित १० वा राष्ट्रीय आदिवासी कोळी समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन माजी आ.रमेशदादा पाटील यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी प्रतिमा व गणेश पुजन आ.लता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. दिप प्रज्वलन माजी.आ.चद्रकांत सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप साळुंखे, नगरसेवक कैलासअप्पा सोनवणे, पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे, प्रथम लोकनियुक्त सरपंच सरस्वती सोनवणे, जि.प.सदस्य पवन सोनवणे, श्री माता मनुदेवी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष मुकेशभाऊ सोनवणे याचे हस्ते करण्यात आले.
परीचय मेळाव्यात १७९ युवती व १०० युवक अशा एकुण २७९ उमेदवारांनी परिचय करुन दिला. मेळाव्यात ६३५ वधु-वरांची नोंदणी करण्यात आली तसेच मेळाव्यात नऊ जोडप्याची लग्न जुडली.
याप्रसंगी शांताराम सोनवणे म्हणाले की, हा मेळावा विवाह जोडणीसाठी घेण्यात येतो, परंतु विवाहानंतर काही शुल्क कारणांमुळे वधु-वरांमध्ये घटस्फोटाची वेळ येते. असे होऊ नये यासाठी समाजाने विचार विनिमयाने विवाह निश्‍चित केले पाहिजे. प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमात मुलगा नोकरीवाला आणि निर्व्यसनी असावा ही मागणी युवतींची असते. पण कमी शिकलेल्या मुलींनी कंपनीत जाणार्‍या किंवा चांगला शेती करणारा  मुलाची अपेक्षा ठेवावी. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष नात्याने आतापर्यंत आम्ही समाजातील बरेच वधु-वरांची तंटे मिटविले आहेत असे ही त्यांनी सांगितले.   

Leave A Reply

Your email address will not be published.