पकडलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी अज्ञात वाळूमाफियाकडून प्रांताधिकारी ,नायबतहशीलदारास दमबाजीचा प्रयत्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर जात असल्याचा सुगावा लागल्याने निवासी नायब तहसीलदार अमित भोईटे व वाहन चालक राजु माळी यांना सोबत घेऊन माहेजी येथून साजगाव कडे जाणारा ट्रॅक्टर खेडगांव (नंदिचे) येथील हॉटेल पांडुरंग गार्डन जवळ  पकडण्यात आले,वाहन चालकास वाहन पाचोरा येथे घेवून येण्याची सुचना दिल्यावरही चालकाने वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व नायब तहसीलदार अमित भोईटे राजू माळी यांनी पाठलाग करत  ट्रॅक्टर कृष्णापूरी येथील भारत डेअरी स्टाॅप पर्यंत आनल्यानंतर  वाहन चालकाने सात ते आठ अज्ञात वाळूमाफियांना भ्रमतध्वनी करून बोलावून घेतल्यानंतर त्यांनी गोंधळ घातला, या वेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मोबाईल शूटिंग सुरू केले  जवळच असलेल्या काही नागरिकांनी अज्ञात वाळूमाफियांना चांगलाच चोप दिला.
पाचोरा विभागात उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्या पासून अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या आहे,परिणामी गेल्या पंधरा दिवसांपापूर्वी वाळू माफियानेत्यांचे निवासस्थानी जाऊन दगडफेक करूनत्यांच्या कुटूंबीयांवर प्राण घातक हल्ला केला, तरीही न डगमगता उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध रात्री अपरात्री फिरुन कारवाईचा सपाटा सूरुच ठेवला आहे, असेच माहेजी येथील दिपक सावळे याचे टॅक्टर अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचा निनावी फोन आल्यानंतर उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व नायब तहसीलदार अमित भोईटे यांनी खेडगाव जवळ टॅक्टर अडवून तहशिलदार कार्यालयात आनण्याच्या सुचना  केल्याने वाळू माफियांनी राडा घातला,जवळच असलेल्या नागरीकांनी सहकार्य केल्याने व्हिडियो शूटिंगमुळे अनर्थ टळला वाहनास  एक लाख २५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.