चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीची गळफास घेवून आत्महत्या

0

 

* साकेगाव येथील घटना; गाणे व नृत्यामध्ये करिअर होत नसल्याचे शल्य
भुसावळ –
करीअर म्हणून नृत्य, गाणे व अभिनयाची आवड असलेल्या 20 वर्षीय तरूणीला तिची इच्छा नसतांना देखील वैद्यकिय क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी तिला आयुर्वेद महाविद्यालयात शिक्षण घ्यावे लागत असल्याचे शल्य वारंवार बोचत असल्याने आज अखेर त्या विद्यार्थींनीने वस्तीगृहातील खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास येथे घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे.

पुजा अरूण पाटील(वय 20) रा.पहुर कसबे ता.जामनेर जि.जळगाव असे या विद्यार्थींनीचे नाव आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, साकेगाव येथील चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय येथे पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या पुजा पाटील हीला गाणे व नृत्यामध्ये आवड होती. मात्र याक्षेत्रात करिअर घडवायचे तिचे स्वप्न होते. परंतु नाईलाजाने मला वैद्यकिय क्षेत्रात यावे लागले. अशी खंत तीने मृत्यूपुर्वी दिलेल्या सुसाईड नोटमध्ये दिली आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नये अशी विनंती तीने चिठ्ठीत केली आहे.

घटनास्थळी पोलिस उशिरा दाखल
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालयात एका वीस वर्षीय विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याचे वृत्त साकेगाव परिसरासह भुसावळात पसरले होते. मात्र घटनास्थळी तालुका पोलिसांनी उशिरा धाव घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान या घटनेमुळे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्रशासनाने घटनेनंतर तात्काळ बैठक घेवून पोलिसांना याबाबत तातडीने माहिती दिली होती.

महाविद्यालयातील वस्तीगृहात पुजा पाटील हिने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने तालुका पो.स्टे.ला फिर्यादी चंद्रकांत नारायण पाटील यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि.सचिन खामखेड करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.