ज्याला बाप कळला नाही ते जगातले सर्वात मोठे पाप -ह भ प दीपक महाराज

0
भुसावळ (प्रतिनिधी )-
जगामध्ये आईची पुण्याई सर्वत्र गायलेली आहे आईच्या मोठेपणा मध्ये तिळमात्र शंका नाही परंतु बाप या विषयावरती इतिहासात खूप नोंदी कमी आढळून येतात आई उब देत असेल तर ती उब मिळवण्यासाठी बाप हा प्रयत्न करतो आणि  हाच बाप आपल्या जीवनात बाजूला राहतो ज्याला बाप कळला नाही ते जगातले सर्वात मोठे पाप असल्याचे ह भ प दीपक महाराज यांनी सांगितले
    पिंपळगाव बुद्रुक येथे  स्वर्गीय भागवत झोपे तीन दिवशीय फिरती व्याख्यानमाले चे आयोजन करण्यात आले पिंपळगाव खुर्द येथील शास्त्री विद्यालयात पहिले पुष्प ह भ प दीपक महाराज यांनी गुंफले यावेळी बोलताना ते म्हणाले की आई ही आपल्या जीवनात नक्कीच मोठी आहे परंतु जे सुख आई देत असेल ते आपल्याला बापामुळे असते आपल्याला रागावणारा कठोर बाप दिसतो परंतु त्याच्या रागावल्यामुळे आपल्या जीवनात होणारे बदल आपल्याला दिसून येत नाही त्याच्या रागावण्या मध्ये देखील चांगला गुण असतो आधुनिक केला पुरणाची जोड देताना ते म्हणाले की कृष्णजन्म झाला त्यावेळी वासुदेवाने भर पावसामध्ये टोपली मधून तुरुंगातून कृष्णाला बाहेर नेले राम वनवासात असताना राजा दशरथाने त्याच्या पावलावर पाऊल टाकत सुख देण्याचा प्रयत्न केला तर छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य निर्माण करता यावे यासाठी दुःख सहन करून पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या शहाजी राजा नेमका आपल्यापासून दूर राहिला बाप कठोर असला तरी तो नारळासारखा आत मधून गोड असतो त्याला रडता येत नसले तरी तो मनातून मृदू असतो म्हणून आपल्या वडिलांना दुखवू नका आपल्या मुलाला मुलीला सुख मिळावे यासाठी तो काबाडकष्ट करतो आपली मुले मोठी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करतो मात्र मुलगा किंवा मुलगी वाममार्गाला लागून दुःख देते तेव्हाचा क्षण हा त्याच्या आयुष्याला मरणाकडे नेणारा असतो यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या वडिलांविषयी आदर व्यक्त करा असे प्रतिपादन यावेळी केले
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शास्त्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून सरस्वती व स्वर्गीय भागवत झोपे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
    यावेळी दि वरणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा वंदना पाटील म्हणाल्या की वडील काबाडकष्ट करतात म्हणूनच आपल्याला दोन वेळचे अन्न व डोक्यावरती छत्र मिळते ज्यांना वडील नाही  त्यांना त्याचे दुःख विचारा निश्चितपणे विदारक असते वडिलांमुळे घराला आधार व सुरक्षा मिळते आपल्या मुलाला जगातली सर्व सुख मिळावे यासाठी तो नेहमीच धडपडत असतो
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शास्त्री विद्यालयाचे संस्थेचे अध्यक्ष बाबुराव सरोदे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नारायण सरोदे सुधाकर बेंडाळे पुंडलिक सरोदे शालीक सरोदे वंदना पाटील अतुल झांबरे चंद्रशेखर झोपे रामा झोपे महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर के वाघ शास्त्री विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सरोज तडवी आदी मान्यवर उपस्थित होते
*चौकट*……
 उद्या दुसरे पुष्प
पिंपळगाव खुर्द येथील हरी कीटकुल बढे माध्यमिक विद्यालयात  रावेर येथील कै के एस ए गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील प्राध्यापक तथा भुसावळ येथील जागर प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंकज पाटील दुसरे पुष्प दुपारी दोन वाजता गुंफणार आहेत यावेळी चंद्रकांत बढे सर अध्यक्षस्थानी असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.