मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटिल बनले ‘थेट पोलिस’.

0
बोदवड – जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिरसाळा येथील मारोती मंदिर सर्वांनाचा बहुचर्चित आहे.येथे दर शनिवारी भाविक मोठ्या संख्येत दर्शनासाठी गर्दी करत असतात. विशेष.मार्गशिष महिन्यातील प्रत्येक शनिवारी मंदिर परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त होत असते. आज मार्गशिष महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने हजारो भाविकांनी दर्शनासाठी शिरसाळा मारोती येथे गर्दी केली.नवस फेडण्यासाठी आलेल्या शेकडोच्या संख्येतील भाविकांना जागा अपुरी पडली तर वाहने १ किमी पर्यंत पार्किंग झाली असल्याने गर्दीचा थरार ह्या दिवशी बघावयास मिळाला. भाविक स्वत:ची वाहने थेट नो पार्किंग झोन मध्ये नेत असल्याने सर्वांचींच झुंबड ऊडाली. परिणामी,गर्दीमुळे रस्ता जाम होऊन ट्रॉफिक झाल्याने बंदोबस्तासाठी असलेल्या होमगार्ड मित्रांची दानादान उडाली.
दर शनिवार प्रमाणे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा मतदार संघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार चंद्रकांत पाटिल हे येथे मारोतीरायांच्या दर्शनासाठी येत असतात.जेव्हा जेव्हा गर्दी असते तेव्हा तेव्हा ते ट्रॉफिक मोकळी करण्यासाठी रस्त्यावर दिसुन येतात.आता पुन्हा ;परत एकदा ते ट्रॉफिक मोकळी करतांना दिसले आणि क्षणांतच त्याचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाले.त्याचे कारण आता ते जिल्हाप्रमुख नव्हे तर मतदार संघाचे आमदार आहेत.त्यांच्या हजरजबाबी व साधेपणाची पुन्हा प्रचिती आली.’नागरिकांना त्रास होतो म्हणुन पहिल्यांदाच रस्त्यावर उतरणारा आमदार आज मतदार संघातील जनतेने पाहिला असल्याने याबाबत त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.