‘उरी’नंतर आता ‘बालाकोट’ स्ट्राइकचा थरार !

0

संजय लीला भन्साळी बनवणार चित्रपट

मुंबई: उरी हल्ल्यावर आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ नंतर आता ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ चित्रपट येणार आहे. संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर अभिषेक कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची आधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या बालाकोट परिसरातील तळांवर बॉम्ब्सचा वर्षाव केला. या हल्ल्याचा थरार आता मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे.  उरी हल्ल्यावर आलेल्या ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर आता ‘बालाकोट एअरस्ट्राईक’ चित्रपट येणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली आहे.

26 फेब्रुवारी 2019 मध्ये हिंदुस्थानी हवाई दलाने केलेल्या बालाकोट एअर स्ट्राईकवर संजय लीला भन्साली, भूषण कुमार, महावीर जैन आणि प्रज्ञा कपूर चित्रपट बनवणार आहे. तर अभिषेक कपूर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याला समर्पित करण्यात येणार आहे. या एअरस्ट्राईकवर दोन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार असून दुसऱ्या चित्रपटात विवेक ओबेरॉय दिसणार आहे. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू-कश्मीर, दिल्ली आणि आग्रा या जागांची निवड करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.