संयमाचा बांध फुटला !

0

भाजपचे दिवंगत नेते स्व गोपीनाथ मुंडे याच्या जन्मदिवशी परळी येथील गोपीनाथ गडावर झालेल्या भव्य मेळाव्यासह लक्षवेधी ठरले ते माजी मंत्री एकनाथराव खडसे महाराष्ट्रातील आजची भाजपची स्थिती जनतेला मान्य नाही. कारण शेटजी भटजी पक्ष म्हणून ओळखल्या  जाणाऱ्या भाजपला स्व गोपीनाथ मुंडे यांनी बहुजनांचा पक्ष बनवला ज्याला गोपीनाथ मुंडेंनी मोठ केल तेच गोपीनाथ मुंडेंना विसरले असा घणाघाती आरोप देवेंद्र फडणविसाचे नाव न घेता नाथाभाऊनी टोला हाणला. आम्ही पक्षाबाहेर पडत नाही पण आम्हाला पक्ष सोडण्यासाठी प्रवृत्त केलं जातंय.

 स्व मुंडेसाहेबाच्या सांगण्यावरून मी संमती दिल्या मुळेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष झाले. मुंडेसाहेब जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे पाठीत खंजीर खुपसायचे नाही. विरोधी पक्ष ते होणार असताना त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदावर मला बसवलं. आज मुंडेसाहेब असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. अशी भावना व्यक्त करून एकनाथराव खडसे भावूक झाले. स्व मुंडेसाहेबाचाही पक्षात छळ  झाला.तसाच छळ माझ्या जीवनात मला सोसावा लागला. माझं जीवन उद्धवस्त केलं गेलं. रोहिणीचा पराभव झाला. पकंजा मुंडेंच्या निवडणुकीत जे घडलं नाही हे घडवलं आहे अशा प्रकारचा थेट आरोपही नाथाभाऊनी केला. तरीसुद्धा पकंजाताई पक्ष सोडणार नाहीत. माझं सोडून द्या माझा भरवसा नाही असे म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला. पाच वर्षांपासून मी मंत्री असताना स्व मुडेसाहेबाच्या स्मारकासाठी औरंगाबाद पशुसंवर्धनची जमीन दिली होती.  परंतु त्या जमिनीवर गेल्या पाच वर्षात स्मारक मात्र बनलेच नाही. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची मी भेट घेतली आणि गोपीनाथराव मुंडेंच्या स्मारकासाठी ३०-४० कोटी रुपयाचा निधी द्या अशी मागणी करताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलखुलासपणे ती मागणी मान्य केली.

 इतकेच नव्हे तर औरंगाबाद दौऱ्यावर आलो तर त्या स्मारकाच्या जागेला मी भेट देईन असे ठाकरे यांनी सांगितल्याचे खडसे यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात फडणवीस सरकारने मुंडे याच्या स्मारकासाठी एक दमडीही दिली आंही याचा विशेषकरून उल्लेख केला. एकनाथराव खडसे याचे १० ते १२ मिनिटाचे भाषण झाले पण त्या भाषणाचा रोख महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस याचेवरच होता. मेळाव्याला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता. व्यासपीठावर पकंजा मुंडे सह महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेचे माजी मंत्री अध्यक्ष हरिभाऊ बागडे. माजी मंत्री प्रकाश मेहता. आदींसह अनेक माजी मंत्रीं. आमदार उपस्थित होते.भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील याची अवस्था पाहण्यासारखी  झाली होती. ते त्याच्या देहबोलीवरूनच दिसत होते. एकनाथराव खडसे यांचेवर झालेल्या आरोपा संदर्भात त्यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात विधानसभेत त्यांनी भाषण केले. माझा गुन्हा तरी काय ?हे तरी सांगा ?अन्यथा मी निर्दोष आहे हे तरी सांगा अशा प्रकारची मागणी त्यांनी आपल्या भाषणातून केली होती आता एवढा मोठा मेळावा असताना त्या मेळाव्याला मुंडेसाहेबावर प्रेम करणाऱ्या लाखोंचा जनसमुदाय असताना नाथाभाऊ गप्प बसतील हे शक्यच नव्हते. स्व मुंडेसाहेब वाघ होते त्या वाघाची पकंजा हि मुलगी आहे म्हणजे ती वाघीण आहे हे लक्षात ठेवा. त्या एकट्या नाहीत त्याच्या पाठीशी आम्ही सारेजण आहोत. असा इशाराही त्यांनी दिला. पक्षाच्या विरोधात जास्त बोल्लो तर शिस्तभगाची कारवाई होईल म्हणून मी जास्त बोलणार नाही. बोलण्यासारखे माझ्याजवळ भरपूर आहे पण आता वेळ नाही असे म्हणताच जनसमुदायातुन बोला बोला असा आवाज घुमत होता. 

स्व मुंडे याच्या जन्मदिवसाच्या गोपीनाथ गडावरील हा मेळावा राजकीय मेळावा नाही तो स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करतोय असे पकंजाताई कितीही म्हणत असल्यातरी तो राजकीय मेळावाच झाला. एकनाथराव खडसेंनी आपल्या मनातील खदखद पूर्ण व्यक्त केली. नाथाभाऊच्या भाषणाविषयी बोलताना पकंजा मुंडे आपल्या आठवणींना उजाळा दिला. त्या आठवणी मनात ठेवल्या असत्या तर त्याच विष होत असं म्हणून पकंजानी नाथाभाऊंच्या समर्थन केल्या भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या मेळाव्याला खास करून उपस्थित होते. मेळव्याआधी चंद्रकांत पाटील पकंजा मुंडे एकनाथराव खडसे प्रकाश मेहता याची पकंजाच्या घरी बद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या चर्चेला मजकूर समजू शकला  नसला तरी राजकारणावर भाष्य करण टाळाव्या अशी सूचना चद्रकांत पाटीलांनी दिल्या असल्याचे समजते तरी राजकारणात विशेषतः देवेंद्र फडणवीस याचे नेतृत्वाविरोधात टीकेची झाडे उठविली गेली. चंद्रकांत पाटलांनी आपल्या भाषणात चुका या माणसाकडून होतात  पक्षाकडून नाही. म्हणून पक्षावर टीका करणे चुकीचे असल्याने मत व्यक्त केले.एकंदरीत गोपीनाथ गडावरील एकनाथराव खडसे आणि पकंजा मुंडे याच्या भाषणाला रोख पाहिलं तर महाराष्ट्रात  भाजपत उकि फूट पडण्याचीच लक्षणे आहेत.                

Leave A Reply

Your email address will not be published.