‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ चा मराठी ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई:  ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचा मराठी ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘जसा मातीच्या प्रत्येक कणात एक पर्वत असतोया, प्रत्येक बीमध्ये एक जंगल, प्रत्येक तलवारीत एक सेना….तसाच प्रत्येक मराठ्यात दडला आहे लाख मराठा…’ अशा दमदार डायलॉगसह चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला आहे. तानाजी मालुसरेंच्या बलिदानाची साक्ष देणारा हा ट्रेलर चाहत्यांची वाहवा मिळवतो आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट हा चित्रपट मराठीतही प्रदर्शित करण्याबाबत अभिनेता अजय देवगण आग्रही होता.

त्यामुळे आता हा चित्रपट १० जानेवारी २०२० ला एकाच दिवशी हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक ओम राऊत म्हणतो, ‘तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मला जगभरात पोहोचवायची होती त्यामुळे मी सुरुवातीला केवळ हिंदीत चित्रपट करायचा अशी कल्पना डोक्यात ठेवून अजय देवगण यांना भेटलो. परंतु, हा चित्रपट मराठीमध्येदेखील प्रदर्शित व्हायला पाहिजे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही शौर्यगाथा पोहोचवायची असल्यास ती मराठीमध्ये सादर करणं महत्त्वाचं आहे याविषयी ते ठाम होते.’

Leave A Reply

Your email address will not be published.