आता नाथाभाऊंचा निशाणा -देव्र्द्र फडणवीस

0

महाराष्ट्रात महिनाभर सत्तास्थापनेचा तमाशा चालल्यानंतर रातोरात  राष्ट्रपती राजवट उठवली गेली. सकाळी आठ वाजता देवेंद्र फडणवीस याची मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भाजप राष्ट्रवादी मिळून स्थिर सरकार देणार अश्या घोषणा केल्या गेल्या आणि अवघ्या ऐशी तासात हे सरकार कोसळले फडणवीस सरकार कोसळताच भाजपातील नाराज वरिष्ठ भाजप नेत्याकडून फडणवीस यांचेवर आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरु झालया भाजपचे खान्देशातील जेष्ठ नेते  माजी मंत्री एकनाथराव  खडसे यांनी पहिल्यांदा घरचा आहेर दिला. निवडणूक प्रचारात भाजपतर्फे विनोद तावडे बावनकुळे एकनाथराव खडसे अश्यासाराख्या नेत्यांना निवडणूक प्रचारात सामावून घेतले असते तर २०-२५जास्तीच्या जागा भाजपच्या निश्चितपणे निवडून आल्या असत्या असा टोला नाथाभाऊंनि लगावला. ज्या अजित पवारांच्या सिचन घोटाळासंदर्भात  गाडीभर पुरावे होते असा आरोप होता त्या अजित पवारांना उपमुख्यामंत्रीपदाची शपथ दिली गेली. सिचन घोटाळ्याचे पुरावे रद्दीत विकले गेले असा घणाघाती नाथाभाऊंनी केला. भाजप पक्ष  वाढविण्यासाठी ज्यांनी आपली हयात घालविली त्यांना उमेदवारी देण्याऐवजी त्याची तिकिटे कापली गेली पक्षाने आयात केलेल्या उमेदवारांना मात्र तिकिटे दिली गेली. निष्ठावंर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. याचा परिपाक म्हणजे भाजपने महाराष्ट्रातील भाजपची सत्ता घालवून बसली याला जबाबदार पक्षाचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस हेच असण्याचा आरोप होतोय. फडणवीस सरकार कोसळले अन सोशल मीडियावर फडणविसावर आरोप प्रत्यारोपाचे जणू युद्ध सुरु झाले आहे. निवडणूक प्रचारात स्वतः मुख्यमंत्री त्याचे विश्वासू मंत्री गिरीश महाजन यांनी अब कि बार २२० के पार अशी वक्तव्ये करीत होते. शत -प्रतिशत भाजप अशाही वल्गना करीत झाल्या विरोधकांच्या चाळीस जागासुद्धा निवडून येणार नाही असे गिरीश महाजन वारंवार बोलत होते विरोधकाकडे आहेच कोण? विरोधी पक्षातील सर्व मोठे नेते भाजपात सामील झाले. असल्याने ते सांगत होते. जेष्ठ नेते एकनाथराव खडसे ऐवजी त्याच्या मुलीला तिकीट दिले गेले. खंडसेचे तिकीट कपण्यामागचे लॉजिक मात्र कळले नाही. केवळ नको त्या भूमीकेतून त्याचे तिकीट कापले गेले असाच प्रचार विनोद तावडे बावनकुळे याच्या बाबतीत झाले. त्याचा फटका पक्षाला बसला. हातातली सत्ता भाजपने घालून बसली. सरकार कोसल्यानंतर नाथाभाऊंनि मोकळेपणाने मानतील खदखद बोलून दाखवली. एकनाथराव खडसे यांनी भोसरी जमीन प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यासंदर्भात चौकशीसाठी आयोग नेमला आयोगाचा अहवाल फडणवीस सरकारने जाहीरच केला नाही. उलट त्याचे मागे अनेकप्रकाराचे शुल्ककाष्ठ लावण्यात आले. त्यावूनही नाथाभाऊनी निर्दोष सुटले तरी त्यांना मंत्री मंडळात घेतले गेले नाही. शेवटच्या विधिमंडळ अधिवेशनात त्यांनी नात्याने सभागृहात भाषण केले. मी दोषी आहे कि निर्दोष हे सरकारने जाहीर करावे अशी मागणी केली परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. शेवटी निवडणुकीत त्याचा पत्ता कट केला. आणि एक हमखास निवडून येणारी जागा भाजपने हातची घालविली हे मात्र खरे आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा देवेंद्र फडणवीसावर मोठा विश्वास त्यामुळे देवेंद्र फडणवीस अंतिम त्याचा शत्रू हे उन्मादाने मस्त झाले होते. त्याचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचेवर राज्याच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवल्याची घोषणा करण्यात आली. परंतु महाजनांच्या स्वतः च्या जळगाव जिल्ह्यात सात पैकी तीन जागेवर भाजपाला हार पत्करावी लागली. रावेर मतदार संघातील हरिभाऊ जावळे याची जागा हमखास निवडून येणारी परंतु महाजनांचे भुसावळचे मित्र अनिल चौधरी यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून निवडणूक लढविली. अनिल चौधरी ४५हजार मते घेतली त्यातील बहूतेक मते हरिभाऊ जावळेची असल्याने हरिभाऊ जावळे पडेल अमळनेर शिरीष दादा चौधरी याची जागा तर केवळ भाजपातील गटबाजीमुळे हातची गेली. तसेच जिल्ह्यातील चार शिवसेना उमेदवारांच्या विरोधात भाजपची छुपी बंडखोरी झाली परंतु ती बंडखोरी हाणून पाडून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. भाजपचे आणि धोरण चुकले ते त्याच्या अंगावर आलेच आणि सत्ता स्थापनेस शिवसेनेने हात दाखवल्यामुळे फडणवीसांनी सरकार स्थापन करुकही ते तारले नाही . शिवसेना कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्राविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. या सर्व घडामोडीत शरद पवार हिरो ठरले. त्याचे राज्यात आणि देश्याच्या राजकारणात महत्व वाढले. कारण स्वतः च्या पुतण्याने केलेले बंडहि तितक्याच चाणक्य नीतीने मांडून काढले. असा भाजपच फडणवीसांविरुद्ध बंड सुरु होईल पक्षातील अंतर्गत विरोधाला ते कश्या पद्धतीने मुकाबला करण्यात हे आपल्याला दिसून  येईलच एकनाथराव खडसे मात्र आता फडणवीस अंती त्याच्या कंपू विरुद्ध मात्र रान  उठवी ल्याशिवाय राहणार नाहीत एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.