आता लक्ष निकालाकडे !

0

जळगाव- महाराष्ट्र विधासनसभा २८८ जागांसाठी आज मतदान पार पडले. राज्यात सरासरी ५५ टक्के मतदान झाले. त्यामध्ये अनेक दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस माजी मुख्यामंत्री अशोक चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण.  छगन भुजबळ, अजित पवार.पंकजा मुंडे धनजय मुंडे. गिरीश महाजन आदीत्य ठाकरे आदी दिग्ग्जाचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.एकूण २८८जागासाठी सव्वातीन हजार उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत जळगाव जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघात एकूण शंभर उमेदवार निवडणूक लढविली आहे शंभर उमेदवारांमधून  एकूण ११ उमेदवार विधानसभेत प्रतिनिधित्व करतील जळगाव जिल्ह्यात ११ पैकी ८ विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार पुन्हा आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यापैकी जामनेरमधून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जळगाव ग्रामीण मधून गुलाबराव पाटील हे नशीब आजमावित आहेत. जळगाव शहरमध्ये राजूमामा भोळे.एरंडोलमधून डॉ सतीश पाटील. अमळनेरमधून शिरीष दादा चौधरी रावेरमधून हरीभाऊ जावळे. भुसावळमधून संजय सावकारे. पाचोरा येथून किशोर अप्पा पाटील. या विद्यमान आमदाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदार संघात माजी मंत्री व भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे. याचे पक्षाने तिकीट कापल्यामुळे त्याची कन्या जळगाव जिल्हा बॅकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे याना भाजपने तिकीट दिल्याने त्याचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. चाळीसगाव मध्ये आमदार निवडून आलेले उन्मेष पाटील हे खासदार झाल्याने त्याचे जागी भाजपतर्फे मंगेश चव्हान याना तर चोपड्याचे विद्यमान आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे याना घरकुल घोटाळ्यांतील न्यायालयीन निर्णयामुळे चोपडा मतदार संघाकडून सेनेतर्फे निवडणूक लढविता आली  नाही त्याचे जागी त्याची  पत्नी लता सोनवणे या चोपडा मतदार संघाकडून नशीब आजमावित आहे.

आज दिवसभर जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते कोणत्याही क्षणी पाऊस पडेल असे वातावरण दिवसभर होते पाचोरा आणि पारोळा येथे थोडाफार पाऊस झाला मतदानावर त्याचा परिमाण झाला  सकाळी सात वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मतदान अत्यन्त धीम्या गतीने पार पडले पावसानेही उसंत घेतली होती दुपारी ३ वाजेनंतर मात्र मतदान केंद्रावरील रांगा वाढल्या प्रत्येक उमेदवार व त्याचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे ३ वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदाराची गर्दी झालेली  दिसत होती मतदान करणाऱ्यावर तसेच मध्यवयीन बरोबरच वृद्ध अपंग याचाही सहभाग होता अनेक वृद्धांना चालत येत नसतानाहि त्यांना उचलून मतदान केंद्रापर्यंत नेण्यास आले. अपंग आपल्या तीनचाकीद्वारा तसेच इतरांच्या सहकार्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचले जळगाव जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही मतदान शांततेत पार पडले शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदारांमध्ये उत्साह जाणवला. जामनेर तालुक्यातील हिवरी या गावातील ग्रामस्थांनी मात्र निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पहूर पासून ४ किमी अंतरावर असलेले हिवरी गाव आणि हिवरी गावापासून जवळच असलेले हिवरखेड हे गाव आहे हिवरी गावातुन हिवरखेडला जायचे असेल तर या दोन्ही गावामध्ये वाघूर नदी असून हिवरीकराना हिवरखेडला जाण्यासाठी वाघूर नदीचा अडथळा येतो वाघूर नदीत फरशी केल्यास हिवरखेडला जाणे शक्य होईल म्हणून वाघूर नदीत फरशी करावी हि हिवरीकराची फार जुनी मागणी होती परंतु ति झाली नसल्याने हिवरी ग्रामस्थांनि अखेर मतदानावर  बहिष्कार  टाकून शासनावरील आपला रोश व्यक्त केला विशेष म्हणजे जलसंपदामंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन याच्या जामनेर विधानसभा मतदार संघातील हे गाव आहे हिवरी गावच्या ग्रामस्थांचा ऐवढा रोश वगळाला बाकी जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले यासाठी ६ वाजेपर्यंत जळगाव जिल्ह्यात सरासरी सुमारे ५५ टक्के मतदान झाले आहे हि  टक्केवारी रात्री उशिरापर्यंत थोडाफार बदल होऊ शकतो हा आकडा ६० टक्का वरच राहिले असे दिसून येते त्यामुळे मतदानाचा टक्का वाढविन्यात यापंचवार्षिक निवडणुकीत प्रशासनाला यश आलेले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान ५ वाजेपर्यंत  रावेरला ६२.२९टक्के तर जळगाव  शहरात अवघे ३९.३२टक्के इतके मतदान झालेले होते मतदारांनी आपल्या मतदानाद्वारे आपला हक्क बजावला आहे आता २४ ऑक्टोबरच्या मतमोजणीकडे आणि निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.