# व्हिडिओ : खळखळून हसवणारा हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज !

0

मुंबई : अभिनेता अक्षय कुमारच्या हाऊसफुल 4 चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 2010 मध्ये हाऊसफुल चित्रपट प्रदर्शित  झाला होता. यानंतर आता चित्रपटाचा चौथा भाग प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दग्गुबती, कृती खरबंदा, कृती सेनन आणि पुजा हेगडे आहे. तसेच चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीही विशेष भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद समजी यांनी केलं आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर, २६ ऑक्टोबर रोजी हा कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हाऊसफुल चित्रपटाच्या प्रत्येक भागात एक वेगळी कथा दाखवण्यात आली. यावेळी चित्रपटात पुनर्जन्मची कथा मांडण्यात आली आहे. हाऊसफुल चित्रपट एक कॉमेडी चित्रपट म्हणून ओळखला जातो. यंदाच्या भागातही चित्रपटात कॉमेडीचा तडखा पाहायला मिळणार आहे.

‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटात सर्व कलाकारांचा पुनर्जन्म झाला असून त्यांना ६०० वर्षांपूर्वीचा काळ आठवत असल्याचे दिसत आहे. तसेच चित्रपटात सगळ्याच कलाकारांचा डबल रोल असणार आहे. ट्रेलरमधील अक्षय कुमारचा लूक पाहता सर्वांना ‘भुल भुलैय्या’ चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हा ट्रेलर ऑस्ट्रेलिया, दुबई आणि युके येथे एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आला आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपट प्रेक्षकांना पोटधरुन हसवायला सज्ज असल्याचे दिसत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.