पाय घसरल्याने विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

0

वरखेड शिवारातील घटना

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरखेड येथे २३ वर्षीय तरुणाचा गावाजवळील विहिरीत पाय घासरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.१५ रोजी सकाळी घडली आहे. खुशाल माधवराव पाटील (वय-२३) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, खुशाल पाटील याचा वरखेड शिवारातील मोतीलाल गुलाब पाटील यांच्या शेतातील विहरित पाय घसरून पडला व त्याचा पाण्यात मृत्यू झाला. दिलीप नत्थु पाटील (रा. वरखेड) यांच्या खबरिवरून भडगाव पोलिस स्टेशन ला ५०/१९ सी. आर. पी. सी. १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांनी भेट दिली. पुढील तपास पो. कॉ. भास्कर बडगुजर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.