आचार्य गजाननराव गरुड पतसंस्थेतर्फे नेत्र तपासणी शिबीर संपन्न

0

शेंदुर्णी (प्रतिनिधी) : रविवार दि. 15 रोजी मुळीक नेत्र चिकित्सालय व आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी यांच्या संयुक्त विद्यमानाने शेंदुर्णी येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे ३20 च्या वर रुग्णांची मोफत नेत्र तपासनी करण्यात आली असून १३ रुग्णांनवर जळगाव येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. १५० च्या वर रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये नेत्र तपासनी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया, लसिक लेझर शस्त्रक्रिया याविषयी मार्गदर्शन आणि निदान करण्यात आले. मुळीक नेत्रालय जळगाव यांच्यासयुक्त विद्यमाने नेत्रालायाच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून निदान केले.

यावेळी संस्थेचे चेअरमन संजय गरुड, पं.स. सदस्य डॉ. किरण सूर्यवंशी, मधुकर चौधरी, नगरसेविका  भावना जैन, सुधाकर बारी, अंबरिष गरुड, प्रदीप धनगर, गुलाब खा मस्तान खा, निसार पहिलवान, अविनाश निकम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रवींद्र गुजर, स्नेहदीप गरुड, विनोद चौधरी, योगेश गुजर आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सदर शिबीरास मुळीक नेत्रालय जळगाव यांच्या वतीने डॉ. परेश भावसार, डॉ. विकास पंडित, विशाल वारके, अतुल अमृतकर यांनी रुग्ण तपासणी केली तसेच डॉ. अजय सुर्वे, डॉ. किरण सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.