दंतवैद्यक शास्त्रात डॉ.पूजा महाजन उत्तीर्ण

0

यावल :-  येथील माजी सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा खान्देश डेअरी फॉर्म संचालक प्रकाश सखाराम महाजन आणि सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका सौ विद्या प्रकाश महाजन यांची मुलगी कुमारी डॉक्टर पुजा प्रकाश महाजन हि दंतवैद्यक शास्त्र ( BDS ) या अभ्यासक्रमातून हिरे दंतवैद्य कॉलेज नाशिक येथील अभ्यासक्रमाचा शेवटच्या वर्षाचा निकाल दि 5 रोजी रोजी लागला त्यात कुमारी पूजा महाजन ही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे.

कुमारी डॉक्टर पूजा महाजन हिने या आधीसुद्धा माध्यमिक शालांत  (SSC ) परीक्षेत भुसावल येथील के. नारखेडे विद्यालयातून सन 2011- 12 मध्ये 98.73 टक्के गुण मिळविले आहे, आता यापुढे भारतीय प्रशासन सेवेची तयारी करणार असल्याचे सुद्धा मनोगत तीने व्यक्त केले आहे तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.