शुभम जैन सर्वात कमी वयात ‘सी.ए’ परीक्षा उत्तीर्ण

0

भडगाव (प्रतिनिधी) :- येथील शुभम कंवरलाल जैन हा विद्यार्थी अवघ्या बाविसव्या वर्षी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाला. तो महाराष्ट्रातला सर्वात कमी वयात सी ए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी ठरला आहे. शुभम जैन हा अवघ्या 22 व्या वर्षी सी ए झाला आहे. त्याला 800 पैकी 422 गुण मिळाले. तर 11 हजार 92 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2 हजार 213 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तो येथील व्यापारी कंवरलाल जैन यांचा मुलगा तर मदनलाल जैन यांचा पुतण्या आहे. त्याच्या निवडीबद्दल भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, आमडद्याचे माजी सरपंच रणजित, भाजपचे तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, भरत पाटील, डाॅ.शेखर पाटील, मिलिंद बोरसे, दिपक पाटील, राजेंद्र आचारी, किरण भोसले, शैलेश पाटील, नाना हाडपे, यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.