दहावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर: २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

0

पुणे: राज्य मंडळाचा दहावीच्या फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल आज जाहीर झाला. एकूण २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण २ लाख २१ हजार ६२९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५०, ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. १७ जुलै ते ३० जुलै २०१९ या कालावधीत ही परीक्षा झाली होती.

विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे.एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख १८ हजार १६१ एवढी आहे. मुंबईत एकूण ५३,९३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी ७,८१२ विद्यार्थी या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले.

गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत शनिवार ३१ ऑगस्ट ते सोमवरा ९ सप्टेंबर पर्यंत आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतींसाठी ३१ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

मंडळनिहाय निकाल 

विभागीय मंडळ – टक्केवारी 

पुणे – १८.१२

नागपूर – ३०.८९

औरंगाबाद – २८.२५

मुंबई – १४.४८

कोल्हापूर – १५.१७

अमरावती – २९.५३

नाशिक – २५.०८

लातूर – ३१.४९

कोकण – १५.८१

Leave A Reply

Your email address will not be published.