दहावी फेरपरीक्षेचा निकाल आज !

0

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे १७ ते ३० जुलै २०१९ या कालावधीत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर हा निकाल ऑनलाइन जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून या निकालाची प्रत (प्रिंटआऊट) घेता येणार आहे.

ऑनलाइन निकालानंतर गुणपडताळणीसाठी विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्ट ते ९ ऑगस्टपर्यंत संबंधित विभागीय मंडळात अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना जुलै २०१९ च्या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कार्यालयीन वेळेत पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार जुलै २०१९ च्या १० वीच्या परीक्षेत सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीनुसार दोन संधी मिळणार आहेत. मार्च २०२० मध्ये होणाऱ्या १० वीच्या परीक्षेत बसू इच्छिणारे पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंर्तगत परीक्षा देणारे विद्यार्थी व अन्य विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.