जळगाव जिल्हा शाखा राजा महाराजसिंग पुरस्काराने सन्मानित

0

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या राज्य शाखेची वार्षिक बैठक संपन्न
जळगाव ;- समाजसेवेचे ब्रीद अंगीकारून समाजोपयोगी विविध कार्यांमध्ये अग्रेसर राहणाऱ्या जळगाव जिल्हा रेडक्रॉस सोसायटीच्या शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा राजा महाराजसिंग फिरत्या चषकाचा पुरस्कार देऊन गुरुवारी मुंबई येथे गौरविण्यात आले .

राज्यातील रेडक्रॉस सोसायटीच्या असलेल्या ३३ शाखांमध्ये जळगाव जिल्हा रेडक्रॉस शाखेला हा मान मिळाला . तर द्वितीय क्रमांकाचा एन. सी . पुरी पुरस्कार पुणे जिल्हा रेड क्रॉसला मिळाला . याबाबत राज्यपालांनी अभिनंदन केले .
गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान कार्यात महत्वाची कामगिरीसह इतर अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जिल्हा रेडक्रॉस सोसायटी हि सातत्याने महत्वाचे कार्य करीत आली आहे . याच कार्याची दखल राज्य रेडक्रॉस सोसायटीने घेत मुंबई येथे गुरुवार १० रोजी संस्थेच्या वार्षिक बैठकीत हा पुरस्कार राज्य चेअरमन के. एम. गरडा ,व्हाईस चेअरमन सुरेश देवडा , कोषाध्यक्ष मिली गोलवाला , जनरल सेक्रेटरी टी.बी. सकलोत यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला . संस्थेचे जळगाव जिल्हा पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्यावतीने रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी , रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी , सहसचिव राजेश यावलकर आदींनी पुरस्कार स्वीकारला . संस्थेचे राज्य शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी जळगाव आणि पुणे जिल्हा रेडक्रॉस सोसायटीला पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . हा संस्थेच्या कार्याला प्रोत्साहन देणाराअसल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.