द बर्निंग कारचा थरार !

0

भडगाव येथे चालत्या कारने घेतला पेट ; चारचाकी जाळून खाक ,सुदैवाने जीवीत हानी टळली

*सागर महाजन *

भडगाव ;– सध्या सूर्याच्या प्रकोपामुळे सर्व राज्यात मे हिटचा तडाखा कायम असून आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास चालत्या चारचाकीने पेट घेतल्यामुळे वाहन चालकाच्या सतर्कतेने जीवित हानी टळली. रस्त्यावरच भडगावकरांनी द बर्निंग कारचा थरार अनुभवला.


याबाबत माहिती अशी कि , शहरातील सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय (न्यू इंग्लिश स्कूल) जवळ फोर्ड फिगो ही चारचाकी पारोळाकडून भडगावकडे येत असताना रस्त्यातच गाडीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच वाहनातील तिघांनी पटापट उड्या मारून आपला जीव वाचविला . अवघ्या काही मिनिटातच कार संपूर्ण जाळून खाक झाली .

 

यावेळी तात्काळ भडगाव नगरपालिकाच्या अग्निशामकबंबाने आग विझवून आग आटोक्यात आली. आग विझविण्यासाठी नगरपालिका कर्मचारी, राजू पवार, नितीन पवार, सर्पमित्र विजय कंडारे, सतीश शिंदे, ईसाक मलिक, छोटू वैद्य आदींनी आग आटोक्यात आणली. यावेळी काही काळ दोन्ही कडील वाहतूक थांबवण्यात आली होती. दरम्यान कारचा मालक कोण हे अद्याप कळू शकले नाही . घटनास्थळावरून कारमधील तिघे पसार झाल्याचे समजते .

Leave A Reply

Your email address will not be published.