एकनाथराव खडसेंचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

0

भुसावळात झाले आगमन ; ढोलताशांच्या गजरासह शेकडो समर्थकांनी केला आंनदोत्सव साजरा 

जळगाव : राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना भोसरी जमीन खरेदी प्रकरणात एसीबीने क्‍लीनचीट दिल्यानंतर त्यांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले. भुसावळ रेल्वे स्थानकावर आज सकाळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ढोलताशांच्या गजरासह शेकडो समर्थकांनी आंनदोत्सव साजरा केला यानंतर ते १०० वर वाहनांच्या ताफ्यासह मुक्ताईनगराला रावण झाले . तिथे सौ . मंदाताई खडसे यांनी फार्महाऊसवर खडसे यांचे औक्षण करून स्वागत केले .
एकनाथराव खडसे गेल्या काही दिवसापासून मुंबईत होते. त्यांच्या गुडघ्यावर मुंबईत शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्‍टरांनी नुकताच त्यांना डिस्जार्च दिला. दादर एक्‍सप्रेसने मुंबईहून त्यांचे सकाळी सहा वाजता भुसावळात आगमन झाले. त्यावेळी रेल्वे स्थानकावर ढोल ताश्‍याच्या गजरात कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार संजय सावकारे, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सुवासिनीनी त्यांचे औक्षण केले.


सुमारे १०० वाहनांच्या ताफ्यासह भुसावळ येथून मुक्ताईनगराला ते रवाना झाले. यावेळी रस्त्यात ठिकठिकाणी खडसे यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, मनपातील भाजप गटनेता मुन्ना तेली,संदीप देशमुख, सुनील बऱ्हाटे,जळगावचे माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी, भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष दिपक फालक, चेतन शर्मा,यांच्यासह शेकडो समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.