जळगावातील ५०० खाटांच्या रुग्णालय इमारत बांधकामाच्या १९१ कोटींच्या खर्चास मंजुरी

0

जळगाव ;- येथे नव्याने सुरु होणाऱ्या ५०० खाटांच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयच्या इमारतीच्या बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहमतीने व सचिव समितीच्या मान्यतेने १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दिली असून बांधकामाकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात राबविण्यात येऊन प्रत्यक्षात बांधकामाला सुरुवात होणार आहे .

केंद्र शासनाच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषद,केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषद , केंद्रीय होमिओपॅथी , भारतीय दंत परिषद , व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांच्या मान्यतेने जळगावात नवीन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल अर्थात मेडिकल हब निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे .

या संकुलात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय, ५० विद्यार्थी क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे . या वैद्यकीय महाविद्यालयास ५०० खतांचे रुग्णालय , १०० खतांचे आयुर्वेद रुग्णालय, होमिओपॅथी संलग्नित महाविद्यालयासाठी २५ खतांचे रुग्णालय सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे . आज शासन निर्णय क्रमांक जीसीजे -२०१७ /प्र. क्र.३२६/प्रशा -१दि. १० मे २०१८ अन्वये आज १९१ कोटी ९० लाख २४ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहितीरुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी दिली .

Leave A Reply

Your email address will not be published.