हिरड्या मजबूत तर दात मजबूत; मजबूत हिरड्यांसाठी

0

मुंबई : दातांसोबत हिरड्यांचं आरोग्यही महत्वाचं असतं, यावर दातांचं आरोग्य अवलंबून असतं. सर्वात महत्वाचं म्हणजे दातांची मजबुती ही स्वच्छतेवर अवलंबून असते. हिरड्या अस्वच्छ असतील, यामुळे दात तुटणे, रक्त येणे अशा अडचणी येतात.

जेवण केल्यानंतर किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर अनेक जण दात स्वच्छ करत नाहीत. निदान चुळ भरणे चरी आवश्यक असते, ते देखील अनेक लोक करत नसल्याने, दातांवर घट्ट स्तर निर्माण होतो.

दातांना कीड लागते आणि…

या जंतुमुळे दातांना कीड लागते. याचा परिणाम हिरड्यांवर होतो. हिरड्या सुजतात, हिरड्यातून रक्त येते किंवा दात आणि हिरड्यांमध्ये अंतर तयार होतं. यासाठी दातांची समस्या उद्भवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार न झाल्यास हिरड्यांमध्ये पु सुद्धा होऊ शकतो.

कच्च्या भाज्या चावून खा

हिरड्या मजबूत ठेवण्यासाठी कच्च्या भाज्या चावून खाव्यात. ‘सी’ जीवनसत्व असलेल्या फळांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे, यामुळे हिरड्या मजबूत होतात. आवळा, संत्री तसेच मोसंबी अशी फळे खाणे दातांसाठी नेहमीच चांगले असते.

दात अधिक मजबूत ठेवण्यासाठी दिवसातून दोनवेळा दात घासले तर सर्वोत्तम..

Leave A Reply

Your email address will not be published.