सुरेशदादांच्या निर्णयाने भाजप गोटात खळबळ

0

जळगाव विधानसभा मतदार संघात 2014 चा अपवाद वगळता सुरेशदादा जैन हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. 2014 मध्ये सुरेशदादा कारागृहात असल्याने त्यांना प्रत्यक्षात निवडणूक प्रचारात भाग घेता आला नाही. त्याचा फायदा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेचा फायदा भाजपचे उमेदवार आ. सुरेश भोळे उर्फ राजुमामा यांना झाला. सुरेश भोळे निवडून आले. दादांना पराभव पत्करावा लागला. येणार्याा विधानसभेच्या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची सुरेशदादांनी इच्छा व्यक्त केली होती. परंतु गेल्या साडेचार वर्षाच्या कालावधितील आ. राजुमामा भोळे यांच्या अकार्यक्षम कारभारावर शिवसैनिकांची कमालीची नाराजी तर आहेच शहरवासीय सुद्धा आमदार भोळेंच्या कामाबाबत नाराज आहेत. रायात आणि केंद्रात घेऊन शहर विकासाबाबतचे कसलेही ठोस काम केले नाही. नेतृत्वात जी कल्पकता हवी, जी कार्यक्षमता हवी, जी धडपड असायला हवी त्याची तसूभरही चुणूक आ. भोळेंमध्ये दिसून आली नाही गेल्या अनेक वर्षापासून शहरातून जाणारा महामार्ग मृत्यूमार्ग बनला असतांना त्याला समांतर रस्ते होऊ शकले नाही. गेल्या चार वर्षापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी समांतर रस्त्याला मंजुरी दिली असतांना त्याचा पाठपुरावा करून समांतर रस्ते करू शकले नाही उलट समांतर रस्त्यांसाठी झालेल्या आंदोलनात आमदार भोळे सहभागी हे आश्चर्यच होय. समांतर रस्त्यांऐवजी महामार्गाचे चौपदरीकरणाला मंजूरी मिळूनही सहा महिने झाले अद्याप ते कामही प्रलंबित आहे. हकनाक शहरवासीयांचे अपघातात बळी जाताहेत. महानगरपालिकेत भाजपची पाशवी बहुमताची सत्ता येऊन वर्ष लोटले. मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी दिलेले 100 कोटी रूपये खर्च करू शकले नाहीत. महानगरपालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलाचा प्रश्न 2012 पासून प्रलंबित असतांना अद्याप सुटलेला नाही. उलट गाळेधारकांचा प्रश्न चिघळवण्यास त्यांचे धोरण कारणीभूत ठरत आहे. शहराचे ते स्वत: आमदार आणि महापालिकेचे महापौर त्यांच्या धर्मपत्नी असतांना विकास कामे गतीमानतेने व्हायला हवी होती परंतु ती होत नाहीत याचे कारण काय? गाळे प्रश्न सुटला गेला तर महापालिकेचे थकलेले कोट्यवधी रूपये मिळू शकतील त्यातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. परंतु निर्णयक्षमता नसल्याने सर्व प्रश्न प्रलंबितच आहेत.
आमदार म्हणून जळगाव शहराचे प्रतिनिधीत्व करतांना गेल्या साडेचार वर्षात त्यांचेकडून कसलीही कल्पकता दिसून आली नाही. महापालिकेवर असलेल्या हुडकोच्या कर्जाचे हप्ते थकल्याने हुडकोने महापालिकेचे सर्व बँक खाती सील केले आहेत. त्यामुळे महापालिकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. रायात केंद्रात भाजपची सत्ता असतांना हुडकोचा प्रश्न लिलया सोडवायला हवा होता. परंतु महापालिकेवर ओढवलेल्या या नामुष्कीला जबाबदार कोण? हा प्रश्न न्यायालयात असून 2 जुलै रोजी त्यावर निर्णय होणार होता परंतु त्याचा आता 4 जुलै रोजी निर्णय होणार आहे. महापालिकेच्या बाजूने निकाल लागला तर ठिक अन्यथा निकाल विरोधात गेला तर महापालिकेचे सर्व व्यवहार आणखी किती दिवस ठप्प ठेवणार? जळगाव महापालिकेत खाविआची सत्ता असतांना महापालिकेला दिवाळखोरीत लोटले, असा आरोप केले जात होते. परंतु गेल्या वर्षभरात भाजपची सत्ता असतांना महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी भाजप सत्ताधार्याांनी काय केले? हा खरा प्रश्न आहे. महापालिकेला निधी अभावी काही गोष्टी करणे शक्य नसल्याने काही विकासाची कामे लोकसहभागातून केली पाहिजेत. खाविआच्या कारकीर्दीत गांधी उद्यान आणि भाऊंचे उद्यान हे दोन चांगली उद्याने निर्माण झाली. आज जळगावकर त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ घेताहेत. मेहरूण तलावाच्या सुशोभीकरणाचे कामही मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून झाले तशी लोकसहभागातून करण्यात येणारी कामे का होऊ शकली नाहीत. उलट महामार्गावरील अजिंठा चौफुलीचे लोकसहभागातून होऊ घातलेले सुशोभिकरातून भाजपच्या सत्ता कालावधित रखडले गेले. त्याचे कारण काय? महापालिकेत सत्ता कुणाचीही असो त्याचे शहरवासियांना देणे घेणे नाही. त्यांना हव्यात सुखसुविधा, फिर्यााच्या पाण्याचेही नियोजन नसल्यामुळेच शहरवासीयांना दोन दिवसांऐवजी तीन दिवसाआड पाणी देऊन वेठीस धरले जातेय. पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या वर्षभरात महापालिकेच्यावतीने कसलेही नियोजन करण्यात आले नाही हे खरे नाही काय? या व इतर सर्व बाबीं आ. भोळे यांना भोवणार्याा आहेत. रायात विधानसभा निवडणुकीत भाजप – सेनेची युती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जळगाव शहर विधानसभा मतदार संघावर शिवसेना आपला हक्क मागणार आहे. त्यातच सुरेशदादा जैन यांनी निवडणूक रिंगणात उमेदवार असल्याने भाजप गोटात मात्र खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.