यांत्रिकी (मॅकेनिकल ) अभियांत्रिकीला सुगीचे दिवस

0

गणित व भौतिकी या मूलभूत विज्ञान शाखांच्या पायावर आधारलेल्या अभियांत्रिकीच्या या शाखेमध्ये यंत्रे व शक्तिनिर्मिती यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. विशेषतः यंत्रांशी निगडित अशी प्रेरणा, गती व कार्य यांचा या शाखेत अधिक संबंध येतो. शक्तिनिर्मितीची विविध यंत्रे (उदा., निरनिराळी इंजिने व टरबाइने); कापड, कागद, साखर यांसारख्या उपभोग्य वस्तूंच्यानिर्मितीसाठी लागणारी यंत्रसामग्री, सायकल, मोटारगाडी,आगगाडी, विमान यांसारखी वाहतुकीची साधने आणि ही यंत्रे व साधने तयार करण्यासाठी लागणारी लेथ, रधित्र, छिद्रण यंत्र वगैरे विविध प्रकारची यांत्रिक हत्यारे या सर्वांचा यांत्रिक अभियांत्रिकीत अंतर्भाव होतो. या अनेक यंत्रांचे आराखडे करणे, त्यांचे भाग बनविणे व जुळविणे, कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया, उत्पादित वस्तूचे वितरण व एकूण व्यवस्थापन करणे या गोष्टींचाही यात समावेश होतो.  मेकॅनिकल  इंजिनीरिंग (यांत्रिक अभियांत्रिकी) ही अभियांत्रिकीच्या सर्वांत जुन्या शाखांपैकी एक आहे.

मानवी जीवन कमी कष्टप्रद व अधिक समृद्ध होण्यासाठी, पोषण, निवारा व इतर दैनंदिन गरजा भागविण्याकरिता अनेक वस्तू निसर्गातील कच्च्या मालापासून बनवाव्या लागतात. विविध ऊर्जांचा उपयोग करून या वस्तूंची निर्मिती करण्याच्या व्यवसायास अभियांत्रिकी म्हणतात. माणसाची पहिली गरज म्हणून स्थापत्यशास्त्राची प्रथम प्रगती झाली. यांत्रिक विद्येची वाढ सुतारकाम, धातुकाम अशा कारागिरीच्या स्वरूपात प्रारंभी झाली असली पाहिजे. लढाईच्या तंत्रात यांत्रिक ज्ञानाचा उपयोग वाढत राहिला. हे सर्व ज्ञान पंधराव्या-सोळाव्या शतकांपर्यंत अनुभवावरच आधारलेले होते आणि ते मुख्यतः व्यक्तीपुरते व पिढ्यानुपिढ्या चालणारे असे होते. पंधराव्या शतकानंतर यूरोपमध्ये भौतिकी व गणित या शाखांच्या बरोबर अभियांत्रिकी हा विषय ज्ञानाची एक शाखा म्हणून वाढीस लागला. अठराव्या शतकात स्थापत्य, खाणकाम, धातुविज्ञान, यांत्रिक व रासायनिक अशा अभियांत्रिकीच्या प्रमुख शाखा होत्या. यांपैकी दोन–तीन विषयांत अनुभवाने पारंगत झालेल्या व्यक्तींनी बंदरे, रेल्वे, जहाजे बांधणे यांसारखी मोठाली स्थापत्य-यांत्रिक अशी मिश्र कामे पार पाडली. स्थापत्य अभियांत्रिकीचे पद्धतशीर शिक्षण देणारी संस्था फ्रान्समध्ये १७४७ मध्ये सुरू झाली आणि पुढे इंग्लंड आदी देशांत तिचे अनुकरण झाले. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची सुरुवात वाफेच्या एंजिनाच्या शोधाने अठराव्या शतकात झाली. जेम्स वॉट यांच्या वाफेच्या एंजिनाने (१७८२) वर्तुळाकार गती निर्माण करता आली आणि इतर प्रकारची यंत्रे चालविणे सुलभ झाले. जॉर्ज स्टीव्हेन्सन यांच्या वाफेच्या एंजिनाच्या आगगाडीमुळे(१८२५) वाहतूक करण्याच्या पद्धतीत क्रांती झाली. अशा महत्त्वाच्या शोधांमुळे यांत्रिक अभियांत्रिकी हा विषय एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्वतंत्र मानला जाऊ लागला. यातून यांत्रिक विषयांचे शिक्षण देणाऱ्या शाळा आणि यंत्रविद्येत पारंगत असलेल्या व्यावसायिकांच्या स्वतंत्र संस्था यांचा उगम झाला.

रोजगाराच्या संधी –
मॅकेनिकल क्षेत्रातील रोजगाराच्या संधी काल आज आणि उद्या होत्या आणि राहतील.  कारण जगाच्या पाठीवर सर्वच देशांना विकासाचे वेध लागले आहेत.  त्यामुळे विकसित होत असलेल्या देशातील सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञाचा वापर मोठया प्रमाणात होत आहे.  आजमितीला यंत्र विकसित करणारा मानव स्वतः एक यंत्र स्वरूपाने समाजात वावरत आहे.  ज्याची ओळख म्हणजे रोबो यांत्रिक मानव.  त्यामुळे या क्षेत्रातील अगणिक संधी आहेत.  शासकीय क्षेत्रात  रेल्वे विभागात कनिष्ठ अभियंता, मेंटेनन्स इंजिनिअर, लोको पायलट, डिझाईन इंजिनिअर म्हणून,  निमशासकीय क्षेत्रात वर्कशॉप व्यवस्थापक, मेंटेनन्स व्यवस्थापक, डेपो व्यवस्थापक, मॅकेनिकल इंजिनिअर, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात, महानगरपालिका, पाटबंधारे, एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी, सर्व खासगी व नवरत्न कंपन्यांमध्ये यांत्रिकी अभियंता म्हणून नोकरीच्या अमाप संधी उपलब्ध आहेत.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रायसोनी महाविद्यालयाचे वेगळेपण –
जी.एच.रायसोनी समूहाच्या उद्दिष्टाप्रमाणे विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून त्यांचे हित लक्षात घेऊन त्यांचा विकास केला जातो. महाविद्यालयात शिकविणा-या शिक्षकांना देखील उद्योग क्षेत्रातील अद्ययावत माहिती व्हावी यासाठी त्यांना देखील प्रशिक्षण घेण्यासाठी पाठविले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम तथा इतर अभ्यासक्रमा व्यतिरिक्त आपल्याशी संबंधित ज्ञान मिळते. औद्योगिक जगताचा चेहरा त्यांना वाचता यावा यासाठी इंटर्नशिप ट्रेनिंग घेण्यासाठी पाठविले जाते. विविध कंपन्यांना तीन ते चार वेळा इंडस्ट्रीयल व्हीझिट दिल्या जातात. तसेच अत्याधुनिक सखोल ज्ञान मिळावे यासाठी आयआयटी, एनआयटी शासकीय अधिकारी, उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना वेळोवेळी बोलावून मार्गदर्शनपर कार्यशाळा, पिअर टीचिंग, माजी विद्यार्थी संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. प्रात्यक्षिके करण्यासाठी कॉम्प्युटर इंटिग्रेटेड मॅनिफॅक्चरिंग लॅब, थ्रीडी प्रिंटर लॅब व इतर विकसित तंत्रज्ञानाच्या लॅब उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासह सामाजिक बांधिलकी जोपासता यावी यासाठी लाईव्ह प्रोजेक्टची कामे दिली जातात. तसेच नोकरीसाठी आवश्यक व्यक्तीमत्व विकास, चाचणी सराव प्रशिक्षण, प्रभावी इंग्रजी संवाद साधण्यासाठी लँग्वेजेस सॉफ्टवेअरचे कोर्स शिकविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, अभ्यासातील अडचणी दूर करता येतात. मुलाखत उत्तमपणे देता येते, जागतिक स्थरापर्यंत जाण्याची संधी मिळते. असा एकंदरीत सर्वांगीण विकास याठिकाणी करण्यात येतो.

– प्रा.राजेश दहिभाते
विभागप्रमुख यांत्रिकी  अभियांत्रिकी शाखा
जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग आणि मेनेजमेंट, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.