जळगाव महानगरपालिकेवर ओढावली नामुष्की

0

जळगाव महानगरपालिकेत प्रदिर्घ काळ असलेली खान्देश विकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावून वर्षभरापूर्वी भाजपने सत्ता काबीज केली. खान्देश विकास आघाडीच्या काळात महानगरपालिकेवर कर्जाचा डोंगर झाला म्हणून आताचे सत्ताधारी त्यावेळचे विरोधक ओरड करीत होते. महापालिकेवर असलेल्या कर्जामुळे त्याचे व्याज भरता भरता महापालिका बेजार होती. शहराच्या विकासासाठी पैसे नसल्याने विकास कामे ठप्प होती. त्याचा फायदा भाजपने निवडणुकीत घेतला आणि पाशवी बहुतमताने सत्ता प्राप्त केली. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर जळगावकरांच्या अपेक्षा वाढल्या. परंतु सत्ताधारी भाजपचे गेल्या वर्षभरातील कामकाज पहाता जळगाव जनतेचा अपेक्षाभंग झालाय. कारण गेल्या वर्षभरात भाजपने कोणत्याही स्तरावर चांगली कामगिरी केलेली नाही.

मुख्यमंत्र्यांनी जळगावच्या दौर्याात 25 कोटी रूपयांचा दिलेला निधी सुद्धा अद्याप वापरलेला नाही. तो तसाच पडून आहे. हुडकोच्या कर्जाबाबत वन टाईम सेटलमेंट करण्याचे आश्वासन भाजप सत्ताधार्यााने दिले होते. परंतु गेल्या वर्षभरात ते वनटाईम सेटलमेंट करू शकले नाहीत. उलट हुडकोने महानगरपालिकेची सर्व बँक खाती सील केल्याने महानगरपालिकेवर फार मोठी नामुष्की ओढवली गेली आहे. महानगरपालिकेने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. महानगरपालिकेने हायकोर्टात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. त्यानंतर 2 जुलै ही कोर्टाने तारीख दिली आहे. त्यादिवशी मनपाने आपली बाजू कोर्टात मांडल्यावर कोर्टाला ते मान्य झाले तर बँक खात्यांचे सील उघडले जाईल अथवा पुन्हा सील कायम राहील. रायात व केंद्रात भाजपची सत्ता असतांना जळगाव महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी हे काम करवून घेण्यात अपयशी ठरले आहेत. याला सर्वस्वी जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनाच जबाबदार धरले जातेय. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार महापाौर, स्थायी समिती सदस्य दिले आहेत. त्यामुळे विकासकामांऐवजी स्थानिक सत्ताधारी नेते टक्केवारीत गुंतले असल्याचा आरोप विरोध करताहेत त्यात तथ्यांश नाही असे म्हणावे काय? महापालिकेनेचे उत्पन्न वाढल्याशिवाय विकास कामे होऊ शकणार नाहीत वर्षभरापूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपचे संकटमोचक जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेले आश्वासन जळगावकर विसरले नाहीत.

जळगाव शहराचा कायापालट झाला नाही तर आमदारकीसाठी मते मागायला येणार नाही असे गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले होते. महापालिकेत भाजपची सत्ता येऊन वर्ष झाले. आता तीन- चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन प्रचारात जळगावच्या मतदारांना काय सांगतील? मते कोणत्या आधारावर मागतील? असो. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी कसलेही प्रयत्न करत नाहीत. गेल्या 7 वर्षापासून जळगाव महापालिकेच्या मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचे शहराचे आमदार मतांवर डोळा ठेवून गाळेधारकांना खोटे आश्वासन दिले न्यायालयाने गाळेधारकांच्या गाळ्याांच्या जप्तीचा आदेश दिला असतांना त्याची अंमलबजावणी गेल्या वर्षभरात सत्ताधारी करू शकले नाहीत. त्यामुळे शेकडो कोटी रूपये गाळेधारकांकडे आहेत. गेल्या सात वर्षात एक पैसा सुद्धा महपालिका वसुल करू शकलेली नाही. उलट गाळेधारक व्यापारीच महापालिकेवर या संदर्भात रूबाब गाजवत आहेत. केवळ मतांवर डोळा ठेवून आपण महापालिकेला वेठीस धरतो आहोत यांचे किमान भान त्यांना राहिलेले नाही. उत्पन्नच वाढते नसल्याने शहर विकासाची कुठलेच कामे गेल्या वर्षभरात झालेले नाही. 25 कोटी खर्च करायचा प्रश्न आला तर त्याला अमृत योजना आणि भुयारी गटारीचे कारण पुढे केले जाते. साध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महापालिका सोडवू शकलेली नाही. गेल्या वर्षभरात 100 वेळेपेक्षा जास्त पाईप लाईन लिकेज झालेमुळे पाणी वाटप विस्कळीत झाले पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कसलीही उपाययोजना न करता दुष्काळाचे कारण पुढे करून दोन दिवसांऐवजी तीन दिवस आड शहरवासीयांना पाणी दिले जातेय. सर्वस्तरावर वर्षभरात सत्ताधारी भाजप अपयशी ठरलेले आहेत एवढे मात्र निश्चित.

Leave A Reply

Your email address will not be published.