अडत्यांच्या अडमुठ्ठेपणामुळे शेतकरी भरडला जातोय

0

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकमंडळ आणि आडत व्यापारी यांच्यातील अडमुठ्ठे धोरणामुळे शेतकरी मात्र भरडला जातोय. गेल्या 15 दिवसांपासून आडत व्यापार्याांनी बंदचे हत्यार पुकारल्यामुळे शेतकर्याांच्या शेतकर्याांच्या शेतमालाची खरेदी विक्री ठप्प आहे. आधीच दुष्काळामुळे शेतकरी होरपळा गेलाय. त्यातच पावसाच्या प्रतिक्षेत पेरणीसाठी शेतकरी त्रस्त झालय त्यात व्यापारी आणि कृऊबा संचालक मंडळाच्या वादात व्यापार्याांनी बंद पुकारलाय.कृऊपा संचालक मंडळाच्यावतीने कृऊबाच्या जागेवर व्यापारी संकूल बांधण्याच्या रीतसर निर्णय घेतला आहे. सदरच्या व्यापारी संकुलाला बाजार समितीतील आडत्यांचा विरोध कशासाठी ? हे मात्र कळत नाही. व्यापार्याांच्या मालासाठी असलेली संरक्षण भिंत विकासकाने पाडून टाकण्याची घाई केली. त्यामुळे व्यापार्याांच्या मालाला जे संरक्षण होते ते उघड्यावर पडले. व्यापार्याांची ही एक बाजू पटणारी असली तरी संपूर्ण व्यापारी संकुलालाच विरोध करणे ही त्यांची भूमिका पटणारी नाही. व्यापारी संकुल बांधण्यासाठी संरक्षण भिंत तोडणे सुद्धा आवश्यक होते. कारण व्यापारी संकुलाच्या आराखड्या नुसार विकासकाला भिंत पाडणे आवश्यक असल्यामुळे पाडली तर संरक्षणासाठी व्यापार्याांनी कृऊबा संचालकांकडे वेगळी मागणी करणे अपेक्षित होते. परंतु ती भिंतच का पाडली म्हणून आम्ही संप पुकारतो असे म्हणणे आडमुठेपणाचे झाले. तशीच भूमिका व्यापार्याांनी घेतली. त्याच बरोबर कृउबा संचालक मंडळाने सुद्धा थोडी सामंजस्याची भूमिका घेऊन व्यापार्याांची बाजू समजून घ्यावी असे वाटते. कारण कृउबा हे खास शेतकर्याांसाठी निर्माण केलेले आहे. शेतकरी हा कृउबाचा आत्मा असतांना शेतकर्याांची जी होरपळ होतेय त्याबाबत संचालक मंडळाने सामंजस्याची भूमिका बजावणे आवश्यक आहे.

जळगाव कृउबाचे व्यापारी या पद्धतीने वागत आहेत ते पहाता यामध्ये राजकारणाची घुसखोरी झाल्याचे स्पष्ट जाणवते. जळगाव कृउबामधील काही बोटावर मोजण्या इतक्या व्यापार्याांच्या आडमुठेपणामुळे संपाचे हत्यार पुकारून अख्या व्यापार्याांना त्यात गोवले जात आहे. संरक्षक भिंत तोडल्यामुळे व्यापार्याांच्या मालाला संरक्षण मिळत नाही इतपत व्यापार्याांचे म्हणणे मान्य करता येण्यासारखे असले तरी बाकी व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारे विजेते काही खांब काढण्यासाठी व्यापार्यांचा विरोध कशासाठी ? त्याचबरोबर इतर काही अडथळे दूर करण्यासही त्यांचा विरोध समजण्यापलिकडेच आहे. एकंदरित कृउबा संचालक मंडळाने घेतलेल्या व्यापारी संकूल बांधण्यासच विरोध करणे चुकीचे आहे. त्यांचेवतीने सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगावच्या दाणाबाजार व्यापार्याांनी पाठिंबा देऊन एक दिवस त्यांनी बंद पुकारला आज जिल्ह्यातील इतर आडत्यांनी बंद पाळला. व्यापार्याांच्या मागण्यांसाठी व्यापार्याांनी पाठींबा दिला हे समजू शकतो. परंतु संपूर्ण शेतकर्याांच्या मालाची खरेदी विक्री ठप्प असल्यामुळे त्यांचे होरारे हाल याबाबत दखल घेणार कोण? शेतकरी जर संपात उतरला तर व्यापार्याांचा व्यापारच ठप्प होईल. त्यामुळे शेतकर्याांच्या जिवाशी खेळण्याचा जो खेळ चालू आहे तो प्रथम थांबवा. व्यापार चालू ठेऊन व्यापार्याांनी कृऊबा संचालकांबरोबर रितसर लढाई करावी. शेतकरी नाडला गेला तर व्यापार्याांऐवजी समाजाची सहानुभूती शेतकर्याांचा मिळणार आहे हे मात्र व्यापार्याांनी लक्षात ठेवावे.

हा प्रश्न चिघळत चाललाय.यामध्ये लोकप्रतिनिधींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तथापि त्यालाही व्यापार्याांनी जुमानले नाही. दुष्काळाच्या झळा अद्याप कायम असून जून महिना संपत आला तरी अद्याप पेरणी लायक पावसाचा पत्ता नाही. पेरणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्याांसमोर व्यापार्याांनी संप पुकारून वेगळाच मनस्ताप केलाय आता तर हा प्रश्न विधानसभेतही चर्चेला आला. शासनाने हस्तक्षेप करावी अशी मागणी माजी मंत्री एकनातराव खडसे यांनी विधानसभेत केली. अन् मुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मागणी मान्य केली. आतातरी व्यापारी आपली भूमिका बदलून संप माघार घेतील काय?

Leave A Reply

Your email address will not be published.