ए. टी. झांबरे विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत

0

जळगाव –

ए. टी झांबरे माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला  ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. प्रथमतः इयत्ता पाचवीच्या विध्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री डी. व्ही चौधरी सर ,शालेय समन्वयक श्री फेगडे सर ,पर्यवेक्षिका झांबरे मॅडम यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.शाळेतील विविध कक्ष, वर्ग खोल्या यांची माहिती दिली गेली. यावेळी सुचिता शिरसाठे, इ पी पाचपांडे ,पराग राणे सर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तसेच

विद्यालयात समग्र शिक्षा अभियान अंर्तगत श्री डि टी पाटील संचालक के सी इ सोसायटी यांच्या हस्ते पुस्तके वितरित करण्यात आले.मुख्याध्यापक श्री डी व्ही चौधरी ,शालेय समन्वयक श्री फेगडे सर यावेळी उपस्थित होते. ग्रंथालय प्रमुख श्री हेमंत जोशी सर यांनी कार्यक्रम चे सूत्रसंचालन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.