प.वि.पाटील विद्यालयात नवागतांचे स्वागत

0

जळगाव-

केसीई सोसायटी संचालीत गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात ढोल ताशांच्या गजरात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम केसीई सोसायटी चे शिक्षण समन्वयक के.जी.फेगडे , चंद्रकांत भंडारी तसेच मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य वाटप करून व खाऊचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाने वातावरण दिसून आले.

 

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक योगेश भालेराव , सुजाता फालक ,सूर्यकांत पाटील ,  कल्पना तायडे , सरला पाटील , दिपाली चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.