जळगावातील बेदकार वाहतूक आणखी किती बळी घेणार?

0

जळगाव शहरातील रस्त्यावरून होणाऱ्या वहातुकीची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम चालू असल्याचे कारण पुढे करून रस्ते दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्यातच वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते आणखी अरूंद झाले असल्याने वाहतुक विस्कळीत झाली आहे. वाहतुक पोलिसांचे वाहतुकीवर नियंत्रण राहिले नाही. शहरातून डंपर सारख्या मोठ्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी आणली पाहिजे परंतु वाळू- माती – खडी वाहणारे मोठ मोठ्या डंपरची बेदरकार वाहतुक होते. ती कुणाच्या आशीर्वादाने ? शहरातून जाणार्याा महामार्ग मृत्यूमार्ग बनला असतांना शहरातील बेदरकार वाहतुकीने काल एका पेन्शनधारक वृद्धाचा बळी घेतला. शहरातील वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

अयोध्यानगरातील रहिवासी मुरलीधर शिंदे हे आपले पेन्शन घेण्यासाठी सायकलवर स्टेट बँकेत जात असतांना माती वाहरार्याा डंपरने त्याला चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की, मयत मुरलीदर शिंदेंच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. अशा प्रकारे बेदरकार वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम कोणाचे? त्यातच डंपरचालक हा दारूच्या नशेत डंपर चालवत होता असे निदर्शनास आले. तेव्हा वाहनचालकांवरही शिस्तीचा बडगा नाही हे स्पष्ट झाले. अधिक माहिती मिलविली असता आर.टी.ओ.च्या धाकाने हा डंपरचालक त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी बेदरकारपणे चालवत होता. समोरून सायकलस्वार येतोय याची तमा त्यांनी बालगली नाही. सायकलस्वाराला अक्षरश:चिरडले. डोक्यावरून डंपरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. सायकलस्वार वृद्ध जागीच ठार झाला. नेरी नाक्याजवळील एस.टी. वर्कशॉप चौकात सकाळी पावणे अकरा वाजता झालेल्या अपघातानंतर तेथे फार मोठा जमाव जमला. हृदयद्रावक घटनेमुळे सतप्त जमावाने डंपरच्या काचा फोडल्या. डंपरचालकास चोप दिला. वेळीच पोलिस आल्याने संतप्त जमाव शांत जाला. परंतु घरातून पेन्शन घेण्यासाठी बाहेर पडलेले मुरलीधर शिंदेवर अशा प्रकारे काळाने क्रुर घाला घातला. ते कायमचे घराला मुकले. मयत मुरलीधर शिंदेची ओळक त्यांच्या खिशात सापडलेल्या पेन्शनच्या पासबुकावरून पटली. त्यावरूनच त्यांच्या मुलाला कळविण्यात आले. मुलगा किरण हा एमआयडीसीतील कंपनीत नोकरीला आहे. अपघाताचे वृत्त कळताच तो घटनास्थळी पोहोचला. तोपर्यंत मृतदेह रूग्णालयात हलविले होते. परंतु घटनास्थळावरील दृश्य पाहताच तो स्तब्ध झाला. इतक्यात त्याची आई म्हणजे मृत मुरलीधर शिंदेची पत्नी घटनास्थळी येताच दृश्य पाहून हंबरडा फोडला. तिचा आक्रोश पाहून प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. घरता पुरुष गेल्याने शिंदे कुटूंबावर संकट कोसळले होते. या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण? सायकलवर जाणे हा मयत मुरलीधर शिंदेचा गुन्हा होता का?

जळगाव शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. महामार्गाच्या समस्येवर तोडगा निघत नाही. समांतर रस्ता मंजूर होऊन त्याचे काम सुरु होत नाही. जळगाव शहरातील रस्त्याची समस्या सुटत नाही. रस्त्यावरील अतिक्रमणे पुन्हा जैसे थे झाली आहेत. पार्किगंची व्यवस्ता नसल्याने वहाने रस्त्यावर उभी केली जातात. नेरी नाक्याच्या अलिकडे असलेल्या अण्णाभाऊ साठे चौकात तर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान वाहतुक नेहमी खोळंबलेली असते. या चौकात सिग्नल व्यवस्था असून त्याचा उपयोग केला जात नाही. पोलिस अधून मधून येथे राहतात. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणार कोर? याच चौकात ग्रामीण भागात जाणार्याा बसचे स्टँड असल्याने त्या बसेसमुळे सतत वाहतुकीचा खोळंबा होतो हे नित्याचेच आहे. जळगावकरांच्या सहनशिलतेला दाद दिली पाहिजे. परंतु एखाद दिवशी या चौकात सुद्दा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुष्पलता बेंडाळे चौकातील वाहतुकीची समस्या सुद्धा कायम आहे. या ठिकाणी सिग्नलची व्यवस्था असतांना सुद्धा वाहनधारक अनेकवेळा त्याचे पालन करत नाही. अनेक वेळा या चौकात वाहतुकीची केंडी होते. याच चौकात पुष्पलता बेंडाळेचा बळी गेला. त्यामुळेच या चौकाला तिच्या स्मृतीप्रित्यर्थ पुष्पलता बेंडाळे चौक असे नामकरण करण्यात आले आहे. चििा चौक, टॉवर चौक, तसेच नेहरू चौक, शिवाजी चौक आरि स्वातंत्र्य चौकातील वाहतुकीत सुद्धा सुधारणा होण्याची गरज आहे. शहरवासीयांचे जीवन सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित व्यवस्था असणे गरजेचे आहे. शहरातील महामार्गावर असलेले अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, एम.जे. कॉलेज चौक या चौकातुन तर वाहनदारकांना जीव मुठीत धरूनच जावे लागते त्यासाठी महानगरपालिका व पोलिस प्रशासनाने या संदर्भात योग्य ती कालजी घेणे गरजेचे आहे अन्यथा मुरलीधर शिंदेप्रमाणेच अनेकांचे बळी जातील.

Leave A Reply

Your email address will not be published.