मोबाइल ठरताय संसार मोडण्यास कारणीभूत

0

पती म्हणतो ,पत्नी सारखी मोबाइलवर बोलते; तर पत्नी म्हणते पती पासवर्ड का सागंत नाही?

जळगाव, दि. 3 – नाजनीन शेख
अनेक दांपत्याचे संसार मोडण्यास मोबाइल कारणीभूत ठरत आहे . पती म्हणतो ,पत्नी सारखी मोबाईलवर बोलते ; तर पत्नी म्हणते , पती मोबाइलला पासवर्ड का लावून ठेवतात . ते पासवर्ड का सांगत नाही ? असे गार्‍हाणे महिला दक्षता समितीच्या चर्चेतील दांपत्याला वादातून समोर येत आहे .
अनेक कारणांमुळे समाजात घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे . पती – पत्नीच्या वादाची दखल समितीतर्फे घेण्यात येते. महिलांना काही त्रास असल्यास त्या यासमिती आपली व्यथा रितसर मांडतात. याबाबत समितीतर्फे पुढील कार्यवाही केली जाते. छोट्या – मोठया कारणांवरून तुटणारे संसार पुन्हा जुळण्यासाठी या समितीतर्फे त्या जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांच्या मनोमिलनावर भर दिला जातो. जेणे करून त्यांच्या संसाराची वेल पुन्हा बहरेल. काही दांपत्यांना मुलं असतात. यासमितीमार्फत दाम्पत्यांचे मनोमिलन झाल्यानंतर त्यांच्या मुलांना पुन्हा मातृ-पितृ प्रेम मिळते. अन्यथा दांपत्याचा घटस्फोट झाल्यास ही मुले आई – वडिलांच्या प्रेमाला पारखे होऊ शकतात . त्यामुळे यासमितीचे अधिकारी ,कर्मचारी ,पदाधिकारी त्या दांपत्यांच्या संसारातील अडचणी ,संशय कल्लोळ ,त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयन्तशील असतात . दोघ बाजूच्या मंडळीस प्रेमाने अथवा वेळप्रसंगीकायद्याचा धाक दाखवावा लागतो .परंतु , जे संबंध पुन्हा जुळण्याच्या मार्गावरच दिसत नाही ,त्यांना वेगळे व्हायचे असेल ,तर तो निर्णय त्या दांपत्यावर सोपवला जातो .जेणेकरून काही प्रकरणातील संभाव्य अनर्थ टळण्याची भीती दूर होते ,असे या समितीमधील ए.पी.आय नीता कायटे यांनी सांगितले.
यासमितीकडे सव्वा वर्षात 1025 तक्रारी आल्या .त्यातील 226 प्रकरणांमध्ये समजोता झाला . 257 गुन्हे दाखल झाले . 204 प्रकरणांना न्यायालयातून न्याय मिळाला . 337 प्रकरणे निकाली निघाले . एक प्रकरण वर्ग केले तर 441 प्रकरणे असल्याचे कायटे यांनी सांगितले .
यासमितीतर्फे मनोमिलन झालेल्या जोडप्यांचे संसार पुन्हा सुरळीत व्हावे ,याकडे लक्ष दिल्या जाते . यासमितीमध्ये ए.एस.आय सुमन कोलते , अन्नपूर्णा बनसोडे ,महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना अंबिकार , शैला धनगर ,सविता परदेशी , वैशाली पाटील कार्यरत आहेत .या कामकाजासाठी पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांचे मार्गदर्शन लाभतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.