अखेर आदेशबाबाला मरेपर्यत जन्मठेप

0
अखेर आदेशबाबाला मरेपर्यत जन्मठेप
जळगाव.दि.30-  येथील समता नगर परीसरातील एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून करणार्‍या आदेश बाबा उर्फ आनंदा तात्याराव साळुंखे यास दोषी ठरवत  आज शनिवार  30 रोजी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गोविंद सानप  यांनी  सुनावली.
 .   गेल्या 8ते 1 महिन्ंयापूर्वी 12 जून 2018 रोजी सायंकाळी समतानगर परीसरातील धामणवाडा येथून नऊ वर्षीय बालिकेचे अपहरणानंतर तिचा खून करून मृतदेह पोत्यात भरून टेकडीवर फेकून पोबारा केला होता .  त्याच्याविरुद्ध न्यायाधीश गोविंद सानप यांच्या न्यायालयात खटला सुनावणी सुरु होती . यात आदेशबाबावर दोषारोप निषित झाले असून त्याला आज शनिवार 30 रोजी मरेपर्यत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. यात  एकूण 27 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीतर्फे एस. के. कौल यांनी तर सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.केतन ढाके यांनी काम पहिले.  सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती.  परंतु न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावल्याने निकालावर समाधान व्यक्त करीत फिर्यादीला न्याय मिळाला असल्याचे म्हटले आहे.  .
जळगांव जिल्हा सत्र न्यायालयात चाललेल्या या खटल्यात आरोपी आदेशबाबा यास कलम 363 नुसार सक्षम कारावास  , 25 हजार रुपये दंड , कलम 376/3 नुसार मरेपर्यंत जन्मठेप -25 हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची शिक्षा, 376/अ मरेपर्यंत जन्मठेप , कलम 302 नुसार जन्मठेप , कलम 201 नुसार पाच वर्ष शिक्षा, पॉस्को 6 मध्ये 6 वर्ष शिक्षा 25 हजार दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.