पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेस जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या हस्ते प्रारंभ   

0
जळगांव.दि.10- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम आज शहरासह जिल्ह्याभरात राबविण्यात येत असून लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी मंगळवार 12 ते 14 मार्च दरम्यान तीन दिवस आयपीपीआय राबविण्यात येत आहे. हि मोहिम पुर्णपणे यशस्वी करण्यासाठी पालकांनी 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ डोस लसीकरण करून घेणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात या मोहिम शुभारंभप्रसंगी केले.
 जि.प. सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे दोन ड्रॉप देउन लसीकरण मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक संचालक डॉ.पठानशेट्टी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोराव चव्हाण, बाह्य संपर्क वैद्यकिय अधिकारी डॉ. विजय जयकर, डॉ. किरण पाटील, डॉ. बी.आर.पाटील, डॉ.बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद्घाटन ग्रामीण स्तरावर पारोळा येथे आ. डॉ. पाटील यांचा नातु राजवर्धन यास दोन डॉप देउन करण्यात आले यावेळी जि.प.सदस्य रोहन पवार, हिम्मत पाटील,पं.स. उपसभापती  ज्ञानेश्वर पाटील, पं.स.सदस्या सुजाता पाटील, अशोक पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापुरकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप पाटोळे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. समाधान वाघ, गटविकास अधिकारी के.के.गिरासे, जिल्हा प्रशिक्षण केंद्र वैद्यकिय अधिकारी डॉ.बी.आर.पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तुषार मोरे, तालुक्यातील आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.