थंडीत टाचांना भेगा पडू नयेत म्हणून…

0

मुंबई : हिवाळ्यात चेहर्‍याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाचांना पडणार्‍या भेगा, काही दिवसांनी, इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवतात.

तडे पडल्यावर टाचा दुखतात
टाचांना तडे पडल्यावर हिवाळ्यात टाचा दुखतात. पण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या भेगा मिटू शकतात, आणि तुमचे तळ पाय पुन्हा निरोगी आणि सुंदर होवू शकतात.

खोबरेल तेलाने मालीश
थंडी आली की त्वचा कोरडे पडायला लागते. मग शरीराला खाज सुटण, ओठांची त्वचा निघणे असे व्हायला लागते. मात्र हे नीट दिसावे यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो. कधी मॉईश्‍चरायझर लावणे तर कधी खोबरेल तेलाने मालीश करणे असे उपाय केले जातात.

आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करा
याबरोबरच आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करायला विसरु नका. यासाठी तांदळाच्या पीठाचा वापर करा. ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण भेगांना लावा. 10 मिनिटे लावून ठेवल्यानंतर पाय धुवून टाका.

पायांच्या त्वचेला चांगला फायदा
पायांच्या तळव्यांना कायम स्क्रब करा. त्यामुळे पावलांवरची धुळ निघून जाण्यास मदत होईल. पायांच्या त्वचेला चांगला फायदा होईल.

पायालाही मॉईश्‍चराईज करायची सवय ठेवा
थंडीत रात्री झोपण्याआधी आपण चेहर्‍याला मॉईश्‍चरायझर लावतो. त्याचप्रमाणे पायालाही मॉईश्‍चराईज करायची सवय ठेवा. त्यामुळे पायांची त्वचा मुलायम होईल.

थंडीत टाचांना पडणार्‍या भेगांसाठी
ऑलिव्ह ऑइल हे नेहमीच त्वचेसाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे थंडीत टाचांना पडणार्‍या भेगांसाठी त्याचा निश्‍चितच चांगला उपयोग होतो.

भेगांमध्ये घाण साचण्याचे प्रमाण जास्त
विशेषत: महिला दिवसभर घरातील विविध कामे करत असतात. त्यांच्या पायांच्या भेगांमध्ये घाण साचण्याचे प्रमाण जास्त असते. असे होऊ नये यासाठी तुमच्या टाचांना भेगा असतील तर पाय वारंवार पाण्याने धुत राहा. म्हणजे घाण गेली तरी ती वेळच्या वेळी साफ होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.